अहमदनगर Live24 टीम, 26 सप्टेंबर 2021 :- महापालिका कर्मचारी सोसायटी, जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटींसह नगर तालुक्यातील ८ सेवा संस्थाच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू झाली असून या संस्थाच्या निवडणुका नोव्हेंबरमध्ये होत आहेत.
निवडणुकीसाठी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्याची प्रक्रिया सुरू झाली. बाजार समिती निवडणुकीसाठी या निवडणुकीला महत्त्व असणार आहे. कोरोनामुळे या संस्थाच्या निवडणुका लांबल्या होत्या.
आता नगर तालुका उपनिबंधक (सहकार) यांनी नव्याने या संस्थाच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू केली. याबाबतचा नवा अध्यादेश नुकताच जारी करण्यात आला.
त्यानुसार या संस्थाच्या निवडणुकांसाठी प्रारूप मतदार याद्या तयार करण्याची मुदत ३१ ऑगष्ट पर्यत होती. या मतदार याद्या चार प्रतित १७ सप्टेंबरपर्यत नगर तालुका उपनिबंधकांकडे जमा करण्याचे आदेश संबंधित संस्थाना देण्यात आले होते.
नगर तालुक्यातील उक्कडगाव, हिवरेबाजार, जांब, बारदरी, देऊळगाव सिध्दी, दरेवाडी गावातील सेवा संस्थासह नगर महापालिका कर्मचारी पतसंस्था, जि. प. कर्मचारी पतसंस्था या सहकारी संस्थाच्या निवडणुका आता पहिल्या टप्यात होणार आहेत.
नगर तालुक्यातील ३ सेवा संस्थाच्या निवडणुका याआधीच झाल्या आहेत. आता सेवा संस्था निवडणुकासाठी ६ टप्पे करण्यात आले असून पहिल्या टप्प्यातील निवडणुकांची प्रक्रिया नव्याने सुरू करण्यात आली.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम