त्या 12 जागांवरील निवडणूक ओबीसी आरक्षणाविनाच होणार

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 16 डिसेंबर 2021 :- जिल्ह्यात सध्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. ऐन थंडीत राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यातच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे आता येत्या 21 डिसेंबरला होऊ घातलेल्या

नगर जिल्ह्यातील अकोले, पारनेर आणि कर्जत नगरपंचायतीं तसेच ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुका 12 जागांवरील निवडणूक ओबीसी आरक्षणाविनाच होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.(OBC reservation)

यामुळे अनेकांचा हिरमोड झाला आहे. दरम्यान येत्या 21 डिसेंबर रोजी होणार्‍या या तीनही नगरपंचायतींसाठी प्रत्येकी चार जागा आहेत.

त्यामुळे आता या एकूण 12 जागांवर खुल्या वर्गातीलही उमेदवार निवडणूक लढवू शकणार आहेत. ओबीसी आरक्षित म्हणून जाहीर केलेल्या 27 टक्के जागा खुल्या प्रवर्गातील म्हणून पुन्हा जाहीर करण्यात याव्यात.

उरलेल्या 73 टक्के जागांप्रमाणेच या जागांवरील निवडणूक खुल्या प्रवर्गानुसार घेण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. तसेच, या 27 टक्के जागांचे निकाल उरलेल्या

73 टक्के जागांच्या निकालावेळीच लावण्यात यावेत आणि त्यांच्या निवडणुका देखील एकत्रच घेण्यात याव्यात, असे न्यायालयाने सांगितले आहे.

त्यामुळे नगर जिल्ह्यातील अकोले, पारनेर आणि कर्जत नगरपंचायती तसेच ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुका 12 जागांवरील निवडणुकांचा कार्यक्रम पुन्हा जाहीर करण्यात येणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe