ऐन उन्हाळ्यात वीज दरवाढीची झळ

Ahmednagar News : यंदा महावितरणने वीज दरात वाढीचा प्रस्ताव वीज नियामक आयोगाकडे सादर केला होता. ही दरवाढ ३० टक्के असल्याने सर्वसामान्य ग्राहकांना आर्थिक झळ बसणार आहे.

महावितरणचा प्रस्ताव मान्य झाल्याने एप्रिलपासून नवीन दरवाढ लागू झाली आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात वीज दरवाढीची झळ ग्राहकांना बसणार आहे.

काल सोमवारी दि. १ एप्रिल २०२३ ते ३१ मार्च २०२५ साठी वीज दरवाढीचा प्रस्ताव वीज नियामक आयोगाकडे महावितरण कंपनीने सादर केला होता. तो मंजूर करण्यात आल्याने घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक व शेतकरी सर्वच वर्गासाठी वीजदारात मोठी वाढ होणार आहे.

त्यावर ३१ मार्च रोजी निर्णय होणार आहे. महावितरणसह खासगी वीज कंपन्यांनी दिलेल्या वाढीच्या याचिकेवर महाराष्ट्र वीज नियामक आयोगासमोर नुकतीच जनसुनावणी पार पडली. याबाबतचा आदेश लवकरच जारी करणार आहे.

घरगुती वीज ग्राहकांसाठी २ ते ७ टक्के वाढीचा प्रस्ताव ठेवला आहे. २०२४-२५ या कालावधीसाठी कंपनीने वीज दरात ३ आणि ४ टक्के कपातीचा प्रस्ताव ठेवला आहे. तर २०२३-२४ या चालू वर्षासाठी १० ते ३० टक्क्यांच्या दरवाढीचा प्रस्ताव केला आहे.

नेमकी किती दरवाढ

पुढील दोन वर्षांसाठी तब्बल ३० टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव महावितरणने दिला आहे. ही वाढ म्हणजे प्रतियुनिट सरासरी दोन रुपये ५५ पैसे आहे. त्यावरील निर्णय अद्याप प्रलंबित आहे. त्यावर ३१ मार्च रोजी निर्णय होणार होता. या निर्णयास आयोगाकडून मान्यता मिळाली, तर दि. १ एप्रिलपासून वाढीव वीजबिल ग्राहकांना येणार आहे.

महावितरणने सलग दोन वर्षे वीज दरवाढ केली असून यंदाची दरवाढ २० ते ३५ टक्के आहे, त्यात शेतासाठी विजेची दरवाढ ३० टक्के आहे, परंतु कैज दरवाढीच्या प्रमाणानुसार राज्य शासन शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या वीजदराच्या अनुदानात वाढ करीत नाही.

त्यामुळे शेतकऱ्यांच्या दृष्टीने ही वीज दरवाढ पूर्णपणे अन्यायकारक आहे. वास्तविक विद्युत नियामक आयोगाने वीज दरवाढ करण्यापूर्वी ग्राहकांची मते जाहीर सुनावणीद्वारे जाणून घेणे गरजेचे आहे. -डॉ. गौरख बारहाते, माजी ग्राहक प्रतिनिधी, राज्य विद्युत नियामक आयोग, मुंबई

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe