अहमदनगर Live24 टीम, 13 मार्च 2022 Ahmednagar News :- नगर शहरातील कापड बाजारामध्ये व्यापार्यांमध्ये अतिक्रमणांवरून शनिवारी वाद झाला. दरम्यान, आ. संग्राम जगताप यांनी व्यापार्यांशी चर्चा केली.
शिवसेनेने व्यापार्यासोबत बाजारपेठेतील रस्त्यावर ठिय्या आंदोलन केले. बाजारपेठेतील अतिक्रमण हटविण्यासाठी शिवसेनेने महापालिका प्रशासनाला सोमवारपर्यंतचा वेळ दिला आहे.
![](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2022/03/Eliminate-encroachments-in-the-textile-market-otherwise-face-the-consequences.jpg)
दरम्यान सविस्तर वृत्त असे, शहरातील कापडबाजारातील एका दुकानासमोर एकाने हातगाडी लावली. त्यावरून दुकानदार आणि हातगाडी चालकांमध्ये वाद झाला. हे वाद विकोपाला गेले.
दुकानदाराने दुकान बंद करून घेतले. कापडबाजारात दोन गटात मारामारी सुरू असल्याची चर्चा शहरात पसरली. संबंधित हे वाद सोडविण्यासाठी आ. जगताप यांनी बाजारपेठेत येत दोन्ही बाजून समजावून घेत शांततेचे आवाहन केले.
त्यानंतर शिवसेनेचे शहरप्रमुख संभाजी कदम, माजी महापौर अभिषेक कळमकर हे देखील बाजारपेठेत आले. शिवसेनेच्या पदाधिकार्यांनी व्यापार्यासोबत रस्त्यावरच ठिय्या आंदोलन केले.
कापड बाजारातील अतिक्रमण आणि अतिक्रमण धारकांकडून होणार्या दादागिरीचा निषेध केला. कापडबाजार सोमवारपर्यंत अतिक्रमण हटवा, नाहीतर परिणामांना सामोरे जा, असा इशारा शिवसेनेने महापालिका प्रशासनाला दिला आहे.