सावित्री ज्योती महोत्सवातून महिला सक्षमीकरण : पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News : महिला सक्षमीकरणासाठी सावित्री ज्योती महोत्सवात जास्तीत जास्त महिलांनी सहभागी व्हावे. बचत गट फक्त आर्थिक उन्नतीसाठी नव्हे, तर महिलांना सक्षम करण्यासाठी प्रभावी माध्यम असून, या महोत्सवातून महिला सक्षमीकरणाचे कार्य होणार असल्याची भावना पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली.

सावेडी येथे ११ ते १४ जानेवारी दरम्यान सहाव्या राज्यस्तरीय सावित्री ज्योती महोत्सवात होणाऱ्या बचत गट वस्तू विक्री प्रदर्शन व विविध सामाजिक उपक्रमाच्या पाश्र्वभूमीवर महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

या पाश्र्वभूमीवर संयोजन समितीच्या शिष्टमंडळाने पालकमंत्री विखे यांची भेट घेऊन चार दिवसीय महोत्सवाची माहिती दिली. यावेळी महोत्सवाचे स्वागत अध्यक्ष तथा जिल्हा सरकारी बँकेचे शाखा व्यवस्थापक सुहास सोनवणे, माविमचे जिल्हा समन्वयक संजय गर्जे, मुख्य संयोजक अॅड. महेश शिंदे, चंद्रकांत ठोंबे, पोपट बनकर, आरती शिंदे, विनोद साळवे, तनिज शेख, दिनेश शिंदे, गणेश बनकर,

रावसाहेब मगर, बाळासाहेब पाटोळे आदी उपस्थित होते. सावित्री ज्योती महोत्सव यशस्वीतेसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी दिलीप दिघे, राज्य क्रीडा मार्गदर्शक ज्ञानेश्वर खुरांगे, विशाल गर्जे, नेहरू युवा केंद्राचे राज्य उपसंचालक शिवाजी खरात,

सिद्धार्थ चव्हाण, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे, जिल्हा परिषद महिला बालकल्याणचे कार्यक्रम अधिकारी मनोज ससे, समाज कल्याणचे सहाय्यक उपायुक्त राधाकिसन देवढे, समाजकार्य महाविद्यालयाचे संचालक डॉ. सुरेश पठारे,

कासाचे सह प्रकल्प अधिकारी सुनील गायकवाड, अवतार मेहरबाबा ट्रस्टचे संचालक अॅड. मेहरनाथ कलचुरे, जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा चिकित्सक डॉ. संजय घोगरे प्रयत्नशील आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe