पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज संगमनेरमध्ये…

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 31 ऑक्टोबर 2021 :- थोर स्वातंत्रसेनानी भाऊसाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून सुरु झालेल्या हरित सृष्टीचा नवा मंत्र देणाऱ्या दंडकारण्य अभियानाच्या सोळाव्या वर्षाचा आनंद मेळावा तालुक्यातील पिंपरणेच्या कार डोंगर परिसरात आज रविवारी दुपारी १ वाजता पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे,

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सहकार व कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, खासदार सदाशिवराव लोखंडे यांच्या उपस्थितीत आयोजित केल्याची माहिती दंडकारण्य अभियानाचे मुख्य प्रवर्तक आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी दिली आहे.

सहकार महर्षी थोरात यांनी पर्यावरण व सजीव सृष्टीच्या रक्षणासाठी दंडकारण्य अभियान सुरु केले. तालुक्यातील सहकारी, शैक्षणिक व सेवाभावी संस्था, जयहिंद लोक चळवळ, वन विभाग आदींच्या सहकार्याने १६ वर्षात कोट्यावधी झाडांचे रोपण झाले. यामुळे तालुक्यात वृक्षसंवर्धन संस्कृती वाढली.

आज होणाऱ्या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ नेते बाजीराव खेमनर, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष ॲड. माधवराव कानवडे, प्रकल्पप्रमुख नगराध्यक्ष दुर्गा तांबे, महानंदचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे, लक्ष्मण कुटे, थोरात कारखान्याचे अध्यक्ष प्रतापराव ओहोळ,

संचालक इंद्रजीत थोरात, सभापती सुनंदा जोर्वेकर, मीरा शेटे, शंकरराव खेमनर, उद्दोजक राजेश मालपाणी, शिवाजीराव थोरात, थोरात बँकेचे अध्यक्ष अमित पंडित, रामहरी कातोरे, प्रा. बाबा खरात, अ‍ॅड. सुहास आहेर, सुरेश झावरे, सुधाकर रोहम, प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, तहसीलदार अमोल निकम,

जिल्हा कृषी अधिकारी शिवाजी जगताप, पोलिस उपअधिक्षक राहुल मदने, मुख्य वनसंरक्षक नितीन गुदगे, वनसंरक्षक अनिल अंजनकर, उप वनसंरक्षक सुवर्णा माने यावेळी उपस्थित राहणार आहे. कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन अमृत उद्योग समूह, दंडकारण्य अभियान समिती, एसएमबीटी सेवाभावी ट्रस्ट, पिंपरणे व कोळवाडे ग्रामस्थांनी केले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe