जिल्ह्यातील ‘या’ ठिकाणी घरात घुसला इथेनॉलचा टँकर: घराला धडक देताच टँकरने घेताच झाला मोठा स्फोट

Published on -

अहिल्यानगर : इथेनॉलची वाहतूक करणाऱ्या भरधाव वेगात असलेल्या टँकरवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा टँकर एका घरावर जाऊन धडकला. घराला धडक बसताच या टॅंंकरने पेट घेतला. या आगीत टँकरचे व घराचे मोठे नुकसान झाले आहे.

ही घटना कर्जत तालुक्यातील कर्जत – राशीन रस्त्याजवळ कानगुडवाडी फाट्याजवळ घडली. या घटनेत नारायण साळवे यांच्या घराची पडझड झाली आहे. दरम्यान, या वेळी घरात कोणीही नसल्याने सुदैवाने जीवित हानी टळली.

याबाबतची माहिती अशी की, (एमएच ११ सीएच ३९७०) हा इथेनॉलची वाहतूक करणारा टॅंकर कर्जतवरून राशीनच्या दिशेने येत होता. हा टॅंकर कानगुडीवाडी फाटयाजवळ आला असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने टॅंकर नारायण साळवे यांच्या घरावर जाऊन धडकला. या धडकेनंतर सदरच्या टँकरने लगेच पेट घेतला.

या वेळी सुदैवाने घरामध्ये कोणीही नसल्याने मोठी जीवितहानी टळली. या घटनेत टँकरची केबिन व वाहनाच्या सर्व चाकांचा स्फोट होऊन वाहन आगीमध्ये भस्मसात झाले. या वेळी राशीन – कर्जत रोडवर काही काळ वाहतून ठप्प झाली होती.

आग विझविण्यासाठी कर्जत नगरपंचायतची अग्नीशामक दलाने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्यासाठी ग्रामस्थांची मदत घेत शर्तीचे प्रयत्न केले. याबाबत रात्री उशिरापर्यंत राशीन दूरक्षेत्रामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू होती.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News