रेल्वे स्थानकाजवळ मृतदेह आढल्याने खळबळ

अहमदनगर Live24 टीम, 29 ऑक्टोबर 2021 :- राहुरी तालुक्यातील टाकळीमिया येथील रेल्वे स्थानक नजीक शुक्रवार दि 29 ऑक्टोबर रोजी पुरुष जातीचा बेवारस मृतदेह आढळून आला आहे.

टाकळीमिया रेल्वे स्थानकाच्या बाजूला वयोवृद्ध पुरुषाचा मृतदेह पडलेला दिसताच देवळाली पोलीस चौकीचे पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रभाकर शिरसाठ,

श्री.माळी यांनी धाव घेऊन सदर मृतदेह साई प्रतिष्ठानचे रुग्णवाहिका चालक रवी देवगिरे यांच्या मदतीने पुढील कार्यवाहीसाठी राहुरी नेण्यात आला आहे.

दरम्यान या मृतदेहाची अद्याप ओळख पटली नसून पुढील तपास राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe