कारखान्यांनी ऊसदर जाहीर करा ! शेतकरी संघटनेचा रस्ता रोको

Published on -

Ahmednagar News : साखर कारखान्यांनी गळीत हंगाम सुरु करुनही अद्याप ऊस दर जाहीर केलेला नसून कारखान्यांनी तात्काळ भाव जाहीर करावा, तसेच केंद्र सरकाने उसाच्या रसापासून इथेनॉल निर्मितीवर बंदी आणल्याच्या निषेधार्थ काल शनिवारी (दि.९) दुपारी १२ वाजता अहमदनगर – छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील नेवासा फाटा येथे सुमारे एक तास शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले.

उसाच्या रसापासून इथेलॉन निर्मिती करण्यास केंद्र सरकारने बंदी घातली. तसेच कांदा पिक निर्यात बंदी केल्यामुळे केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे, प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष अभिजीत पोटे,

काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष अण्णासाहेब पटारे, काँग्रेसचे राजु वाघमारे, शोभा पातारे, शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष त्रिंबकराव भदगले, शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष बाबासाहेब नागोडे, अशोक नागोडे, नेवासा तालुका शेतकरी संघटनेचे कायदेशीर सल्लागार अॅड. बाळासाहेब कावळे आदींनी आक्रोश व्यक्त केला.

नेवासा तालुका शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष त्रिंबक भदगले यांच्या नेतृत्वाखाली हे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी बद्रिनाथ चिधे, काळे मेजर, रमेश मोटे, सतिश लंघे, किरण लंघे यांनी आंदोलनात सहभाग होत सरकारच्या धोरणाविरोधात घोषणा दिल्या.

आंदोलन यशस्वी करण्यासाठी शेतकरी संघटनेचे तालुका संपर्क प्रमुख नरेंद्र काळे, कल्याण काळे, विजु मते, विश्वास मते व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe