ट्रॅक्टर अंगावरून गेल्याने शेतकऱ्याचा मृत्यू

Published on -

Ahmednagar News : उताराला लावलेला ट्रॅक्टर अंगावरून गेल्याने कर्जत तालुक्यातील करपडी येथील सौदागर देवा काळे (वय २६), या शेतकऱ्याचा चिरडून मृत्यू झाला.

सौदागर काळे यांच्या छातीवर, चेहऱ्यावरून ट्रॅक्टरचे मागील चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

ट्रॅक्टरची बॅटरी उतरत असल्याने तो सुरू करण्यासाठी काळे यांनी ट्रॅक्टर उताराला उभा केला होता.

या वेळी उताराला लावलेला ट्रॅक्टर अंगावरून गेला, त्यामध्ये सौदागर देवा काळे यांचा मृत्यू झाला.

या घटनेमुळे करपडी गावावर शोककळा पसरली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe