Ahmednagar News : पालकमंत्री तथा महसूल, दुग्धविकास व पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणीचे विद्यमान सदस्य विश्वनाथ कोरडे व सहकाऱ्यांनी पारनेर शेतकऱ्यांच्या वतीने सन्मान करण्यात आला.
पारनेर तालुक्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीकविमा योजना २०२३ अंतर्गत १६ कोटी रूपये अग्रिम रक्कम वाटपास मंजुरी देऊन तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा करण्यात आल्याने शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

तसेच आता दूध उत्पादकांना प्रतिलीटर ५ रुपये अनुदान देण्याच्या घेण्यात आलेल्या निर्णयाबद्दलही समाधान व्यक्त होत आहे. त्यामुळे आता शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.
विमा कंपनी विरोधात पारनेर तालुक्यातील सोयाबीन उत्पादकांच्या बाजूने विश्वनाथ कोरडे यांनी जाहीर भूमिका घेतली होती. विखे यांनी सकारात्मक भूमिका घेत तालुक्यातील शेतकऱ्यांना २०२३ च्या खरीपातील प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत सोयाबीन पिकाची अधिसूचना मान्य करत १६.०५ कोटी रुपयांची विमा कंपनी मार्फत मंजुरी मिळवून दिली.
दूध उत्पदकांना ५ रुपये अनुदान मंजूर केले. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने हा सन्मान करण्यात आल्याचे विश्वनाथ कोरडे यांनी यावेळी सांगितले. यावेळी कोरडे यांच्या सोबत अहमदनगर भाजपाच्या विविध पदाधिकाऱ्यांसह,
पारनेर तालुक्यातील भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष सुनील थोरात, अहमदनगर जिल्हा महिलाध्यक्ष अश्विनी थोरात आदी सहकारी उपस्थित होते. यावेळी हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. नेहमीच शेतकऱ्यांची काळजी घेण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे मंत्री राधाकृष्ण विखे यांनी सांगितले. यावेळी शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.













