शेतकऱ्यांनी कांदा मार्केटचे लिलाव बंद पाडले

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 11 जानेवारी 2021 :-गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या दरात चढ उतार होत आहे. नुकतेच शेवगाव तालुक्यात लिलावात काद्यांला कमी भाव मिळाल्याने कांदा मार्केटचे लिलाव शेतकऱ्यांने बंद पाडले होते.

शेवगाव बाजार समितीच्या आवारात सोमवारी नेहमीप्रमाणे कांद्याची मोठी आवक झाली होती. शेवगाव, पाथर्डी, नेवासा, कडा, आष्टी, धामनगाव आदी ठिकाणाहून शेतकऱ्यांचा कांदा विक्रीसाठी आला होता.

दुपारी १२ वाजता कांदा लिलाव सुरू झाला असता व्यापाऱ्यांनी एक नंबर कांद्याचा २ हजार ३०० ते २ हजार ६०० रुपये असा कमी दराने लिलाव सुरु केला.

तर दोन व तीन नंबर कांद्याला भावाची गळती लावली, इतर ठिकाणी झालेला लिलाव पाहता हे दर न परवडणारे असल्याने शेतकऱ्यांत संताप निर्माण झाला.

आणि त्यांनी सदर लिलाव बंद पाडले. याबाबत काही शेतकऱ्यांनी माजी आमदार चंद्रशेखर घुले, भाजपा जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे यांच्याशी संपर्क साधला,

घुले यांनी फोनवर भाववाढुन देण्याबाबत व्यापाऱ्यांना तंबी दिली तर मुंडे यांनी तातडीने कांदा मार्केटला भेट देऊण शेतकऱ्यांशी संवाद साधला व व्यापाऱ्यांशी भाववाढ देण्याबाबत चर्चा केली. शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन व्यापाऱ्यांना भाववाढीच्या सुचना देण्यात आल्याने लिलाव पुर्ववत सुरू झाले.

फेरलिलावात एक नंबर कांद्याचा ३ हजार ते ३ हजार २०० दोन नंबर कांद्याला २ हजार ६०० ते २ हजार ९०० तर तीन नंबरला १ हजार २०० असा लिलाव झाला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment