Ahmednagar News : जमिनीचा मोबदला मिळण्यासाठी शेतकऱ्यांचे १५ ऑगस्टला उपोषण !

Published on -

Ahmednagar News : ताजनापूर उपसा सिंचन योजना टप्पा क्र. एकच्या डाव्या कालव्यासाठी जमिनी गेलेल्या शेवगाव तालुक्यातील जुने दहिफळे येथील शेतकऱ्यांनी जमिनीचा मोबदला मिळण्यासाठी येत्या १५ ऑगस्ट रोजी शेवगाव तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.

याबाबतची माहिती अशी की, ताजनापूर उपसा सिंचन योजना टप्पा क्रमांक एकच्या डाव्या कालव्यासाठी जुने दहिफळ शिवारातील शेतकऱ्यांच्या सन २००७-०८ मध्ये संपादित करण्यात आल्या होत्या.

जमिनी संपादित होऊन पंधरा वर्षे पूर्ण झाली तरी अद्यापही शेतकऱ्यांना मोबदला मिळालेला नाही. शेतकऱ्यांना मोबदला मिळण्यासाठी पंधरा वर्षापासून शासनाकडे वारंवार पाठपुरवठा केला आहे; परंतु शानकीय अधिकाऱ्यांकडून उडवाउडवीचे उत्तरे शेतकऱ्यांना देण्यात आली, त्यामुळे या शेतकऱ्यांनी आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.

निवेदनावर निसार पठाण भगवान बर्डे, मच्छिद्र कारगुडे, गणेश बर्डे, भगवान पिसोटे जाकिर पठाण, अंकुश कारगुडे, शहावाज पठाण जावेद पठाण, विष्णु शिंदे आदी शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.

शेतकऱ्यांच्या संपादित केलेल्या जमिनीचे पैसे मिळावेत, यासाठी भरपूर प्रयत्न करूनसुद्धा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या भूसंपादन शाखेने लक्ष न दिल्यामुळे उपोषणाचा मार्ग अवलंब वा लागला आहे. : इब्राहिमभाई पठाण, शेतकरी, जुने दहिफळ.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News