Ahmednagar News : दिवसेंदिवस पर्जन्यमान कमी होत असून बारमाही वाहणाऱ्या नद्या आता हंगामी झाल्या आहे. नदीकाठचा शेतकरी उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. दुष्काळाचा धोका टाळण्यासाठी शासकीय वाळू लिलाव बंद करण्यासाठी गोदावरी संघर्ष व बचाव कृती समितीने कोपरगाव तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणास सुरूवात केली आहे.
कोपरगाव तालुक्यातील गोदावरी बचाव संघर्ष कृती समितीचे सुरेगाव, सांगवी भुसार, कोळगाव थडी पंचक्रोशीतील सर्व शेतकऱ्यांना सुरेगावमध्ये झालेला शासकीय वाळू लिलाव तात्काळ बंद करण्यात यावा.
लिलावामध्ये अवैध उत्खनन करणाऱ्या लिलावधारकांवर, ठेकेदारावर उत्खनन केलेल्या जागेचे तात्काळ पंचनामे करून फौजदारी गुन्हे दाखल करावे, लिलाव धारकांच्या अवैध वाळू उत्खननाला पाठीशी घालणाऱ्या महसूल अधिकाऱ्यावर कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी तात्काळ गुन्हे दाखल करून निलंबन करावे,
अश्या या उपोषणकर्त्यांच्या मागण्या असून जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही आता हटणार नाही. असा इशारा दिला असून सदर उपोषणामध्ये सुरेगावचे माजी उपसरपंच सुहास वाबळे, सामाजिक कार्यकर्ते मोतीराम निकम, सुरेगाव सोसायटीचे अध्यक्ष प्रशांत वाबळे, सुरेगाव ग्रामपंचायतचे सदस्य राजेंद्र मेहेरखांब,
एकलव्य आदिवासी परिषदेचे नेते मंगेश औताडे, सामाजिक कार्यकर्ते यशवंत निकम, कृषी मित्र कैलास कदम, बाबासाहेब वाबळे, संजय वाबळे, मनोज वाबळे, हेमंत वाबळे, सुनील मोकळ, निलेश निकम, देवा निकम, राजू शुक्ला, संतोष राऊत,
योगेश माळी, सचिन राऊत, निसार शेख, मच्छिद्र वाळुंज, भाऊसाहेब जाधव, राजेंद्र कदम, देविदास वाबळे, प्रकाश शिंदे, सोमनाथ कासार, प्रशांत कदम आदी सहभागी झाले आहे. उपोषणाला एकलव्य आदिवासी परिषद व बहुजन भीम पँथर सेना या संघटनेने पाठिंबा दिला आहे.