Ahmednagar News : शेतकऱ्यांनी आपला माल बाजार समितीतच विकावा

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News : कृषी उत्पन्न बाजार समिती कर्जत आणि उपबाजार मिरजगाव उडीद पिकास उच्चतम बाजारभाव देत असून, सर्वसामान्य शेतकऱ्यांनी परवानाधारक आडत- व्यापाऱ्याकडे तो विक्री करावा. असे आवाहन कर्जत बाजार समितीचे सभापती काकासाहेब तापकीर यांनी केले आहे. काही अनधिकृत व्यापारी कमी भावाने उडीद खरेदी करीत असल्याचे निदर्शनास येत असून, शेतकऱ्यांनी आपली फसवणूक टाळावी.

खरीप हंगामात उडीद पिकांची मोठ्या प्रमाणात आवक होत असून, बाजार समिती कर्जत व उपबाजार मिरजगाव या ठिकाणी उच्चतम भावात परवानाधारक आडत व्यापारी यांच्याकडून खरेदी होत आहे.

मात्र काही खाजगी व्यापारी हे कमी भावात अनधिकृतपने खरेदी करीत असल्याचे कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निदर्शनास येत आहे. शेतकऱ्यांनी त्यांचा उडीद कर्जत किंवा मिरजगाव उपबाजार येथे विक्रीसाठी आणावा.

तसेच परवानाधारक आडत व्यापारी यांच्याकडून विक्रीची अधिकृत हिशोबपट्टी व तोलाई पावती घ्यावी असे आवाहन सभापती काकासाहेब तापकीर यांनी प्रसिद्धी पत्रक काढत केले आहे.

अनाधिकृत व्यापारी शेतकऱ्यांकडून कमी भावाने उडीद खरेदी करत असल्याचे निदर्शनास आल्यास त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल असा इशारा सभापती तापकीर यांच्यासह सर्व संचालक मंडळ आणि सचिव यांच्याकडून देण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe