Nilwande Water : अखेर शेतकऱ्यांचे जलसमाधी आंदोलन स्थगित

Ahmednagarlive24 office
Published:
Nilwande Water

Nilwande Water : निळवंडे डाव्या कालव्याच्या पाण्याने बंधारे भरून द्या, या मागणीसाठी संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे गावांतर्गतच्या बाळपाटीलाची वाडी येथील शेतकऱ्यांनी पुकारलेले जलसमाधी आंदोलन स्थगित करण्यात आले.

उर्ध्व प्रवरा प्रकल्पाच्या सबंधित अधिकाऱ्यांच्या कार्यवाही करण्याच्या आश्वासनानंतर जलसमाधी आंदोलन मागे घेतले, अशी माहिती जलसमाधी आंदोलन पुकारलेले शेतकरी, शिवसेना नेते पंढरीनाथ इल्हे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.

तळेगाव दिघे गावांतर्गतच्या बाळपाटीलाची वाडी शिवारातील बंधारे निळवंडे डाव्या कालव्याच्या पाण्याने भरून द्यावेत, अशी मागणी पंढरीनाथ इल्हे यांच्यासह शेतकऱ्यांनी केली होती.

त्यासाठी कौठेकमळेश्वर शिवारातील निळवंडे कालव्याच्या बोगद्यात काल शनिवारी (दि.९) दुपारी दोन वाजता जलसमाधी घेऊ, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला होता.

मात्र, उर्ध्व प्रवरा प्रकल्प, तळेगाव शाखेचे सहाय्यक अभियंता महेश नागरे यांच्याशी याप्रश्नी मध्यस्थी व सकारात्मक कार्यवाही करण्याच्या चर्चेनंतर जलसमाधी आंदोलन स्थगित करण्यात आले, अशी माहिती पंढरीनाथ इल्हे यांनी पत्रकाद्वारे दिली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe