अखेर खंडकऱ्यांना जमिनी मिळाल्या, स्व. कॉ. गायकवाड व स्व. विखेंच्या संघर्षाला यश : मंत्री विखे

Ahmednagarlive24 office
Published:
vikhe

खंडकरी आकारी पिडित शेतकऱ्यांना जमिनी देण्याचा निर्णय महायुतीच्या सरकारने घेतला. स्व. कॉ. माधवराव गायकवाड तसेच स्व. माजी खासदार बाळासाहेव विखे पाटील यांच्या संघर्षाचे हे फलित असल्याचे प्रतिपादन महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

श्रीरामपूर नगरपालिकेच्या केंद्र शासन पुरस्कार अमृत २.० अभियानांतर्गत शहर वाढीव पाणीपुरवठा योजनेच्या १७८.६० कोटीच्या या योजनेतील कामांचे भुमिपुजन मंत्री विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी व्हिडिओ कॉमद्वारे जनतेशी संवाद साधला.

याप्रसंगी माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, माजी खासदार सदाशिव लोंखडे, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे, ज्येष्ठ नेते इंद्रनाथ थोरात, नितिन दिनकर, दिपक पटारे, गिरीधर आसने, केतन खोरे, नानासाहेब शिंदे, शरद नवले, अभिषेक खंडागळे, बाबासाहेब चिडे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

मंत्री विखे म्हणाले, महाविकास आघाडीचे नेते पूर्ण अपयशी ठरले. श्रीरामपूरकरांसाठी पुढच्या २० वर्षांसाठी पिण्याच्या पाण्याची गरज संपली आहे. युतीचे सरकार प्रामुख्याने कामांना प्राधान्य देत आहे, मात्र आघाडीच्या सरकारने जनतेचे प्रश्न सोडविले नाही.

मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना अतिशय यशस्वी होत असल्याने १९ ऑगस्ट रक्षाबंधना दिवशी आमच्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये दोन महिन्याचे अनुदान देण्याचे महायुतीच्या सरकारने ठरविले आहे. शेतकऱ्यांचे संपूर्ण वीजबिल माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. डॉ. विखे म्हणाले की, मी कोणाच्या अधिकारावर गदा आणणारा माणूस नाही.

त्याशिवाय कार्यक्रमावर अतिक्रमण करणारा माणूससुद्धा नाही. वीस वर्षांत तुमच्याकडून झाले नाही, ते काम मंत्री विखे पाटील यांनी करून दाखविले. श्रीरामपूर तालुक्यातील अनेक गावांना जमिनी मिळणार आहेत. त्यातील ५ हजार गरीबांना अर्थसहाय्य म्हणून अर्धा गुंठा घरकुलासाठी जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

नगर जिल्ह्यात साडेसात वर्षांत माजी महसूल मंत्र्यांनी पदाचा फक्त उपभोग घेतला. काही खंडकऱ्यांना त्यांच्याच जमिनी मिळाल्या नाहीत. नगरपालिकेसाठी २६ एकर जामीन मिळाली. जमीन नसणाऱ्यांना अर्धा गुंठे जमीन वाटपाचा कार्यक्रम लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत श्रीरामपूर येथे होणार आहे. जमिनी मिळाल्यामुळे २०६ कोटी रुपये वाचणार आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe