अखेर शिर्डी विश्वस्त मंडळाला साईबाबा संस्थानचा कारभार पाहण्यास परवानगी

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 01 डिसेंबर 2021 :-  शिर्डी साई मंदिर प्रशासनांबाबत एक महत्वाची महत्वाची माहिती समोर आली आहे. श्री साईबाबा देवस्थान शिर्डीच्या नुतन अध्यक्ष व विश्वस्त मंडळास अखेर उच्च न्यायालयाने कारभार पाहण्यास परवानगी दिली आहे.

श्री साईबाबा देवस्थान शिर्डीच्या नुतन अध्यक्ष व विश्वस्त मंडळास कारभार पाहण्यास काही दिवसांपूर्वी उच्च न्यायालयाने स्थगिती दिली होती. त्याबाबत नूतन अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेऊन उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान दिले होते.

त्याबाबत मंगळवार दि.३० रोजी सुनावणी होऊन सर्वोच्च न्यायालयाने आ.आशुतोष काळे यांनी केलेली याचिका ग्राह्य धरून उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती देत अध्यक्ष व विश्वस्त मंडळाला साईबाबा संस्थानचा कारभार पाहण्यास परवानगी दिली असल्याची माहिती अँड. सोमिरण शर्मा व अँड. विद्यासागर शिंदे यांनी यांनी दिली आहे.

दरम्यान साईबाबा देवस्थान शिर्डीच्या विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आ.आशुतोष काळे यांची निवड केली होती.परंतु राज्य शासनाकडून संपूर्ण विश्वस्त मंडळाची नेमणूक न केल्यामुळे नूतन अध्यक्ष व विश्वस्तांना संस्थानचा पदभार स्विकारण्यापासून मनाई करण्यात आली होती.

त्या आदेशाच्या विरोधात नूतन अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांनी सर्वोच्च न्यायालयात उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान दिले होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe