अखेर शहरांमध्ये स्मार्ट एलईडी पथदिवे बसविण्याच्या कामाला सुरुवात

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 29 ऑक्टोबर 2021 :- नगर शहरांमध्ये स्मार्ट एलईडी पथदिवे बसविण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. यामुळे लवकरच नगर शहराच्या रस्त्यांवर झगमगाट पाहायला मिळणार आहे.

दरम्यान गेल्या अनेक दिवसांपासून अंधारात हरविलेले रस्त्यांवरील पथदिव्यांचे भाग्य उजळणार आहे. नगर शहराचे अनेक वर्षांचे प्रलंबित प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळापासून संपूर्ण नगर शहरामध्ये स्मार्ट एलईडी पथदिवे बसविण्याच्या कामाची सुरुवात झाली आहे. लवकरच शहर प्रकाशमय होण्यास सुरुवात होणार आहे.

राष्ट्रीय, राज्य महामार्गसहित शहरातील अंतर्गत रस्ते त्याचबरोबर कॉलनीतील पोल वरती स्मार्ट एलईडी पथदिवे बसविण्यात येणार आहे. ठेकेदार एजन्सीकडे सात वर्षाची जबाबदारी दिली आहे.

24 तासाच्या आत पथदिवा चालू न झाल्यास संबंधित एजन्सीवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. टोल फ्री क्रमांकावर नागरिकही पथदिवे याबाबत तक्रार नोंदवू शकतात.

यामुळे खऱ्या अर्थाने दिवाळीचा दीपोत्सव आता नगर शहराच्या रस्त्यांवर दिसणार आहे. या कामाची पाहणी वेळी आ. संग्राम जगताप, महापौर रोहिणीताई शेंडगे, उपमहापौर गणेश भोसले,

स्थायी समितीचे सभापती अविनाश घुले,नगरसेवक अनिल शिंदे, विरोधी पक्षनेता संजय शेंडगे, अजिंक्य बोरकर, उपायुक्त यशवंत डांगे, विद्युत विभागाचे प्रमुख वैभव जोशी तसेच आदी मान्यवर उपस्थित होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe