अग्निकांड ! सिव्हिल सर्जन व आरोग्य मंत्र्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 13 नोव्हेंबर 2021 :- नगर मधील जिल्हा शासकीय रुग्णालयात लागलेल्या आगीला जबाबदार धरून आरोग्यमंत्री राजेश टोपे व सिव्हील सर्जन सुनिल पोखरणा यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे.

दरम्यान विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी आज जिल्हा रुग्णालयाला भेट देऊन पाहणी केली. तसेच परिचारिका आंदोलनास भेट देऊन आम्ही तुमच्या पाठीशी असून ज्या परिचरिकाना या घटने बाबत दोषी धरून गुन्हा दाखल केला आहे तो एकदम चुकीच्या पध्दतीचा आहे.

या बाबत आम्ही अजुन माहीती घेऊन सरकारला जाब विचारू असे आश्वासन विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी परिचारिकांना दिले आहे. तसेच पुढे बोलताना ते म्हणाले कि, पोलिसांनी दबावाखाली फक्त सिव्हील च्या कर्मचाऱ्यांवर कारवाई केली का?असा प्रश्न निर्माण होतोय.

आगीच्या संदर्भात एक खिडकी योजना असावी तरच लवकरात लवकर कामे जलद गतीने होतील. जिल्हा रुग्णालयात सध्या आयसीयु विभाग बंद असून तो तातडीने सुरू करावा अशी मागणी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!