अहमदनगर शहर व खराब रस्ते यांचे समीकरण अजून तरी काही सुटलेले नाही. रस्त्यांची दुर्दशा ही शहराच्या पाचवीलाच जणू पुजलेली. आता शहरातील आनंदधाम ते एलआयसी ऑफिस ते स्वस्तिक चौक हा रस्ता सहा महिन्यांपूर्वी पाच कोटी रुपये खर्चुन कॉक्रिटीकरण करून तयार झाला.
पण सहाच महिन्यात या रस्त्याला तडे गेलेत. ठेकेदाराने याठिकाणी डांबर टाकून हे तडे झाकण्याचा प्रयत्न केलाय. या रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले असून संबंधित ठेकेदार संस्थेवर कारवाई करावी अशी मागणी मनसेचे नितिन भुतारे यांनी केली आहे.तशी तक्रारही त्यांनी मनपा आयुक्तांकडे तक्रार केली.

मनपाचे नियंत्रण नसल्याने जनतेचा पैसा वाया
शासन भरपूर निधी देते. असे असले तरी ठेकेदार निकृष्ट पद्धतीने रस्त्यांची कामे करत असल्याचे दिसते. त्यावर मनपाचे नियंत्रण नसल्याने जनतेचा पैसा वाया जात आहे असा घणाघात मनसेने केला.
प्रशासनाने याची गांभीयनि दखल घेत ठेकेदारावर कारवाई करावी. या ठेकेदाराला यापुढे कामाचे टेंडर देऊ नये अशी मागणी भुतारे यांनी आयुक्तांकडे केली आहे.
ठेकेदार संस्थेकडे अनेक कामे
ठेकेदार संस्थेकडे शहरातील अनेक कामे दिलेली आहेत. ते कामे सुरु आहेत. ही कामेही अशीच सुरु राहिली तर नगरकरांना शहरात खराब रस्त्यावरून प्रवास करावा लागेल. त्यामुळे प्रशासनाने रस्त्यावर झालेला खर्च संबधित ठेकेदाराकडून वसूल करावा अशी आग्रही मागणी भुतारे यांनी केली.