अहमदनगर Live24 टीम, 09 डिसेंबर 2021 :- नगर तालुक्यातील अरणगाव येथील बायपास चौकात झेंडा लावण्यावरून दोन गटांत हाणामारी झाल्याची घटना घडली होती.
याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात 200 ते 250 जणांविरूद्ध गुन्हा दाखल केला असून याप्रकरणी 8 जणांना अटक केली आहे. त्यांना बुधवारी दुपारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने 10 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
यामध्ये पोपट विठ्ठल पुंड, आनंदराव गोविंदराव शेळके, सोमनाथ बबन डव्हरे, आकाश उर्फ अक्षय उत्तम धिवर, राजेश उर्फ विकी हरीश कांबळे, राहुल बाबासाहेब कांबळे, दिलीप सदाशिव कांबळे, मेहेरप्रकाश हरीश कांबळे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी कि, अरणगाव येथील बायपास चौकात झेंडा लावण्यावरून दोन गटातमध्ये वाद आहे. यापूर्वी नगर ग्रामीणचे पोलीस उपअधीक्षक अजित पाटील यांनी दोन्ही गटांची बैठक घेऊन मार्ग काढला होता. मंगळवारी गावामध्ये झेंडा लावण्यासाठी दोन्ही गटाची बैठक बोलविण्यात आली होती.
यावेळी काही व्यक्तींमध्ये सुरूवातीला वाद झाले. या वादातून दगडफेक झाली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून जास्त फौजफाटा तैनात केला होता. आता अरणगाव येथील परिस्थिती शांततेची आहे. दरम्यान याप्रकरणी पोलिसांनी 8 जणांना अटक केली असून अन्य आरोपींचा शोध सुरू आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम