पुढच्‍या वर्षी पाणी देणार असे फ्लेक्‍स संगमनेर तालुक्‍यात लावले गेले. तुमचे पुढचे वर्ष नेमके कोणते?

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 18 ऑक्टोबर 2021 :- भाजप सरकारच्‍या काळातच निळवंडे धरणाच्‍या कालव्‍यांची कामांची सुरुवात मुखापासुन होण्‍यास गती मिळाली, परंतू वर्षानुवर्षे ज्‍यांच्‍या ताब्‍यात सत्‍तास्‍थाने होती, त्‍यांच्‍याकडून निळवंडे कालव्‍यांची कामे सुरु होवू शकली नाहीत, ही खरी वस्‍तुस्थिती आहे.

कालव्‍यांच्‍या कामाला कोणाचाच विरोध नाही परंतू दिशाभूल करुन, श्रेयवाद लाटण्‍याचा प्रयत्‍न फक्‍त सध्‍या सरु आहेत असा टोला भाजपा नेते आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी लगावला. पिंप्री निर्मळ येथे सुमारे १ कोटी १६ लाख रुपयांच्‍या विविध विकास कामांचा शुभारंभ आणि लोकार्पन सोहळा आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांच्‍या उपस्थितीत संपन्‍न झाला.

जनसेवा ग्रामविकास मंडळाचे जालिंदर निर्मळ यांच्‍या अध्‍यक्षतेखाली झालेल्‍या या कार्यक्रमास सभापती सौ.नंदाताई तांबे, सभापती भाऊसाहेब जेजूरकर, सरपंच डॉ.मधुकर निर्मळ, उपसभापती बाळासाहेब जपे, चेअरमन भाऊसाहेब घोरपडे, उपसरंपच सौ.वनिता घोरपडे, गटविकास आधिकारी समर्थ शेवाळे, उपअभियंता नानासाहेब वाघमारे,

एन.टी निर्मळ यांच्‍यासह पदाधिकारी,ग्रामस्‍थ याप्रसंगी उपस्थित होते. डॉ.शिवम निर्मळ, डॉ.प्राप्‍ती पारखे, डॉ.श्रीकांत घोरपडे या विद्यार्थ्‍यांनी महाराष्‍ट्र लोकसेवा आयोगाच्‍या परिक्षेत मिळविलेल्‍या यशाबद्दल आ.विखे पाटील यांच्‍याहस्‍ते त्‍यांचा सत्‍कार करण्‍यात आला.

डिजीटल अंगवाडीचे लोकार्पन आणि कोव्‍हीड योध्यांचा सन्‍मान ग्रामस्‍थांच्‍या वतीने करण्‍यात आला. निळवंडे धरणाच्‍या कालव्‍यांच्‍या कामासाठी अद्यापही अडीच ते तीन हजार कोटी रुपयांच्‍या निधीची आवश्‍यकता आहे. शासनाकडून याबाबतची कोणतीही तरतुद नाही.

तरीही पुढच्‍या वर्षी पाणी देणार असे फ्लेक्‍स संगमनेर तालुक्‍यात लावले गेले. तुमचे पुढचे वर्ष नेमके कोणते? असा प्रश्‍न करुन आ.विखे पाटील म्‍हणाले की, जेष्‍ठनेते माजीमंत्री मधुकरराव पिचड यांच्‍या पुढाकाराने तत्‍कालिन मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्‍या उपस्थितीत आपण बैठक आयोजित केली.

त्‍या बैठकीत झालेल्‍या निर्णयानंतरच धरणाच्‍या मुखापासुन उजव्‍या आणि डाव्‍या कालव्‍याची कामे सुरु झाली, सद्य परिस्थितीत हीच कामे आता सुरु आहेत. मात्र केवळ श्रेय लाटण्‍याचा प्रयत्‍न होतो, संगमनेर तालुक्‍यात कालवे पुर्ण झाले तरच राहाता तालुक्‍यात पाणी येणार आहे.

त्‍यामुळे कालव्‍यांच्‍या कामांना कोणाचाही विरोध नाही परंतू दिशाभूल केली जाते. यामध्‍ये आपले स्‍थानिक लोकही बळी पडतात परंतू यामधील वास्‍तव परिस्थिती समजून घेण्‍याची गरज त्‍यांनी बोलून दाखविली. बंद पडलेला गणेश कारखाना प्रवरेने चालविण्‍यास घेतला परंतू काहींनी याला कॅन्‍सरची उपमा दिली.

अनेकजन यासाठी आता न्‍यायालयात गेले आहेत. लोकांसाठी करीत असलेल्‍या कामात विघ्‍न कोण आणत आहेत हे आता लोकांनी ओळखले पाहीजे. रयत मध्‍ये नोकरीला लावण्‍यासाठी घेतल्‍या गेलेल्‍या पैशांची प्रकरण चव्‍हाट्यावर आली. आज हा संस्‍थेतील कर्मचारीच फरार झाला आहे. या भ्रष्‍टाचाराबाबतही लोकांनी प्रश्‍न विचाराले पाहीजेत,

जेष्ठनेते शरद पवारांना याबाबत आपण स्‍वत: पत्र लिहीले परंतू ते याचे उत्‍तर देवू शकले नाहीत अशी माहीती आ.विखे पाटील यांनी आपल्‍या भाषणात दिली. पिंप्री निर्मळ गावासाठी उपलब्‍ध झालेल्‍या १ कोटी १६ लाख रुपयांच्‍या निधीमधील विकसीत झालेली कामे ही या गावाच्‍या आर्थिक, सामाजिक परिवर्तनास कारणीभूत ठरली आहेत.

पाणी योजनेचे काम मार्गी लागल्‍याने टॅंकरचे गाव ही ओळखही आता पुसली गेली आहे. शैक्षणिकदृष्‍ट्या विचार केला तर, उपलब्‍ध असलेल्‍या सुविधांचा योग्‍य उपयोग करुन,

आज या गावातील विद्यार्थी लोकसेवा आयोगाच्‍या परिक्षेत यशस्‍वी होत आहेत हे ख-याअर्थाने मोठे यश असल्याचे त्‍यांनी आवर्जुन सांगितले. याप्रसंगी सरपंच डॉ.मधुकर निर्मळ यांचेही भाषण झाले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe