अहमदनगर Live24 टीम, 17 नोव्हेंबर 2021 :- साईमंदिरात दर्शनासाठी ऑफलाईन पास उपलब्ध करुन देण्याच्या निर्णयाप्रमाणेच संस्थानचे प्रसादालय सुध्दा कोव्हीडचे नियम पाळून भक्तांसाठी तातडीने सुरु करावे अशी मागणी आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्हाधिका-यांकडे केली आहे.
यासंदर्भात कोव्हीड संकटानंतर प्रशासनाने राज्यातील मंदिर सुरु करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र मंदिरात प्रवेशासाठी ऑनलाईन पासेसची सुविधा शिर्डी संस्थानने सुरु केली होती.
ऑनलाईन पासेसची मर्यादा असल्याने शिर्डी येणा-या भाविकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत होते. या संदर्भात आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्हाधिका-यांकडे पाठपुरावा करुन, ऑफलाईन दर्शन पास सुरु करण्याची मागणी केली होती.
या मागणीबाबत जिल्हाधिका-यांनी निर्णय केल्याने आ.विखे पाटील यांच्या पाठपुराव्याला यश आले. प्रशासनाच्या या निर्णयामुळे भाविकांनाही मोठा दिलासा मिळाला आहे.
ऑफलाईन दर्शन पास सुविधेच्या निर्णया प्रमाणेच संस्थानचे प्रसादालय सुरु करण्याबाबतही प्रशासनाने आग्रही भूमिका घ्यावी अशी मागणी आ.विखे पाटील यांनी जिल्हाधिका-यांकडे केली आहे.
कोव्हीडच्या नियमावलीचे पालन करुन, प्रसादालय सुरु केल्यास देशभरातून येणा-या भाविकांना या प्रसादालयाचा लाभ घेता येवू शकेल ही बाब आ.विखे पाटील यांनी जिल्हाधिका-यांच्या निदर्शनास आणून दिली आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम