गडकरींकडे पाठपुरावा केल्यामुळे रस्त्यासाठी मिळाला निधी : कोल्हे

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 11 ऑक्टोबर 2021 :-  साईबाबांची शिडी पूर्वी आपल्या मतदारसंघात होती, नंतर तिचे विभाजन होऊन नवीन मतदारसंघ अस्तित्वात आला. साईबाबांचे मंदिर शिर्डी येथे त्याच्या दर्शनासाठी देश-विदेशातील भाविक येतात.

पण रस्त्याचे हाल प्रचंड म्हणून त्याचा पाठपुरावा मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केला आणि त्यांनी सावळीविहार-कोपरगाव हद्दीतील रस्त्यासाठी दीडशे कोटींचा निधी दिला हा मैलाचा दगड अाहे.

अजूनही निधी मिळवण्यासाठी प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही भाजपच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी दिली. कोपरगाव शहर व तालुका भाजप तसेच मतदारसंघातील रहिवासी यांनी स्नेहलता कोल्हे यांचा जाहीर सत्कार करून केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांचे आभार मानले.

सत्कारास उत्तर देताना त्या बोलत होत्या. प्रारंभी विजय आढाव यांनी प्रास्तविक केले. याप्रसंगी भाजपचे तालुकाध्य साहेबराव रोहोम, कोल्हे कारखान्याचे संचालक प्रदीप नवले,

माजी सभापती सुनिल देवकर, मच्छिंद्र केकाण, शहराध्यक्ष दत्ता काले, विनोद राक्षे, रवी रोहमारे, संदीप देवकर, नवनाथ आगवण, मयूर राऊत, दादा नाईकवाडे, मनीष देवकर, देविदास भिंगारे,

सतीश केकाण, संतोष भिंगारे, अनुराग येवले, मनोज तुपे, अविनाश मालकर, विनोद परदेशी, बापू सुराळकर, प्रवीण भासले, किशोर दरेकर, अंकुश भिंगारे, मंगेश जाधव आदी उपस्थित होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe