अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱयांसाठी सर्वात मोठी बातमी ! ह्या दिवशी बाजार बंद …

Ahmednagarlive24 office
Published:

Ahmednagar News : कृषि उत्पन्न बाजार समिती, अहमदनगरचे यार्डवर सालाबादप्रमाणे श्री. संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळा, श्री क्षेत्र त्रंबकेश्वरवरुन श्री क्षेत्र पंढरपुर पायी जाणारा दिंडी सोहळा शुक्रवार दि. २४व २५या दोन दिवसांकरीता मुक्कामासाठी थांबणार आहे.

दि. २६ रोजी प्रस्थान करणार आहे. सदरची दिंडी समितीचे भुसार व फळे भाजीपाला यार्डवर दोन दिवस मुक्कामी असून दिंडीमध्ये सुमारे ५०,००० वारकरी सहभागी आहेत. त्या अनुषंगाने शुक्रवार दि. २४ ते रविवार २६ या तीन दिवसांकरीता समितीच्या मुख्य बाजाराचे भुसार व फळे भाजीपाला बाजार बंद राहणार आहे.

तसेच शनिवार दि. २५रोजी नेप्ती उपबाजार येथील कांदा लिलाव बंद राहणार आहे.सोमवार दिनांक २७ रोजीपासून भुसार, फळे भाजीपाला व कांदा बाजार नियमित चालु राहील. त्यामुळे भुसार व कांदा फळे भाजीपाला उत्पादक सर्व शेतकरी बांधवानी सदरचे बंद कालावधीमध्ये आपला शेतमाल यार्डवर विक्रीस आणू नये असे आवाहन कृषि उत्पन्न बाजार समिती, अहमदनगरचे प्रशासक .

किशन रावसाहेब रत्नाळे साहेब यांनी केले आहे. यावेळेस समितीचे सचिव श अभय भिसे, सहा सचिव बाळासाहेब लबडे, सहा सचिव सचिन सातपुते व सहा सचिव संजय काळे, भुसार विभागप्रमुख सयाजी कराळे, भाजीपाला विभाग प्रमुख भाऊ कोतकर हे उपस्थित होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe