अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2022 :- येथील अरणगाव रोडवरील मेहेराबाद येथे अवतार मेहेरबाबा यांच्या समाधीस्थळी दरवर्षी होणारा अमरतिथी (पुण्यतिथी) सोहळा कोविडच्या पार्श्वभूमीवर सलग दुसऱ्या वर्षी रद्द करण्यात आला आहे.
तरी दि.३० जानेवारी ते १ फेब्रुवारी या काळात भाविकांनी समाधी दर्शनासाठी गर्दी करू नये असे आवाहन अवतार मेहेरबाबा ट्रस्टच्यावतीने केले आहे.

याबाबत अधिक माहिती देताना डॉ.मेहेरनाथ कलचुरी म्हणाले की, भारतातून जगातून तसेच राज्यातून हजारो मेहेरप्रेमी अमरतिथीला येत असतात.
पण कोविडमुळे यावर्षी अमरतिथी उत्सव साजरा करण्यात येणार नाही. या तीन दिवसात होणारे सर्व कार्यक्रम हे ऑनलाइन पद्धतीने होणार आहेत. यामध्ये ५०० लोकांनी सहभागी होऊन रेकॉर्डिंग पाठवले आहे.
त्यामुळे सर्व मेहर प्रेमींनी कोणीही मेहेराबाद अरणगाव येथे दि.३० जानेवारी ते १ फेब्रुवारी या कालावधीत येऊ नये व सरकारी नियमांचे संपूर्ण पालन करून अमर तिथी उत्सव आपापल्या निवास्थानी,
आपल्या केंद्रात साजरा करावा व अवतार मेहेरबाबा यांचे नामस्मरण करावे. मेहेरबाद येथे संस्थेकडून कुठल्याही प्रकारची सुविधा पुरवल्या जाणाऱ्या नाहीत. तरी सर्व भाविकांनी संस्थेचे संपूर्ण सहकार्य करावे असे आवाहन ट्रस्टच्या वतीने केले आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम