यासाठी अहमदनगरला मिळालं सुर्वणपदक आणि पाच लाखांचं बक्षीस

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 29 मार्च 2022 Ahmednagar News :- करोनाच्या दुसऱ्या लाटेत अहमदनगर जिल्ह्यातील वाढती रुग्णसंख्या राज्यासाठी डोकेदुखी ठरली होती. मात्र, याच काळात जिल्ह्यानं दुसऱ्या एका गंभीर आजारावर मात करून देशपातळीवरील सुवर्णपदक आणि पाच लाख रुपयांचं बक्षीस पटकावलं आहे.

क्षयरोग निर्मूलनाच्या कार्याबद्दल जिल्ह्याला हा बहुमान मिळाला आहे. जिल्ह्यातील क्षय रोगाच्या रुग्णांचं प्रमाण ६० टक्क्यांनी कमी झाल्याचं सर्वेक्षणात आढळून आलं जागतिक क्षयरोग निर्मुलन दिनी देशभरातील विविध जिल्ह्यांना उल्लेखनीय कामगिरीबद्दल गौरवण्यात आलं.

यामध्ये अहमदनगरचा समावेश आहे. राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत जागतिक आरोग्य संघटना व केंद्र सरकार यांच्यातर्फे सर्वेक्षण करण्यात आलं.

त्यातून ही निवड करण्यात आली. यासंबंधी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर यांनी सांगितलं, ‘जिल्ह्यात चौदा तालुके व नगर शहर अशा पंधरा भागात सर्वेक्षण करण्यात आलं.

यामध्ये सुमारे साडेआठ हजार घरांना भेटी देण्यात येऊन ३२ हजार लोकांना प्रश्न विचारण्यात आले. तपासणीसाठी नमूने घेण्यात आले.

त्यावरून असं लक्षात आलं की, २०१५ च्या तुलनेत २०२१ मध्ये रुग्णांची संख्या ६० टक्क्यांनी कमी झाली आहे. हे जिल्ह्यातील यंत्रणेचं यश आहे. त्याबद्दल गौरव करण्यात आला.’

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe