जंगलात लागणारे वणवे सजीवसृष्टीसाठी धोक्याची घंटा ; वनसंपदेचे मोठे नुकसान

Published on -

अहिल्यानगर : महाराष्ट्राला नैसर्गीक वनसंपदेची मोठी देणगी लाभली आहे,परंतु येथील जंगल भागात कृत्रिम वणवे लागत असल्याने या वनसंपदेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. त्यामुळे पर्यावरण प्रेमींमधून संताप व्यक्त होत आहे. दुर्मिळ वनौषधींसह जैवविविधतेची मोठी हानी या वणव्याच्या आगीमुळे होत असून वनविभागाने हे वनवे टाळण्यासाठी जन जागृती करण्याची गरज आहे.

जंगलमध्ये दुर्मिळ वनसंपदे सोबतच पशु पक्षी आहेत,परंतु जंगलांना लागलेल्या वणव्यांमुळे जंगलातील वनसंपदेची अपरिमित हानी होत चालली आहे.यामध्ये मागील पावसाळ्यात नवीन अंकुरित रोपट्यांची व फुट्यांची राख होत आहे.तर फळधारणेनंतर तयार झालेली नैसर्गिक बीजे जळत असल्याने पर्यावरणाची मोठी हानी होत आहे.वणव्याच्या घटना समजताच वन खाते तत्काळ प्रयत्न करत असते तरी उन्हामुळे सुकलेलापालापाचोळा मोठया ज्वाला धारण करत आहेत.

डिसेंबर आणि मार्च,एप्रिल या महिन्यात वणवा लागण्याच्या घटनात वाढ होताना दिसत आहे.या आगीत अनेक वनौषधी,सरपटणारे प्राणी,किटक,तृणभक्षी प्राणी,त्यांची अंडी, घरटी जळून खाक होत असून या आगीत या प्राण्यांचे जीवही जात आहेत.काही वणवे पावसाळ्यात गवत चांगले यावे म्हणून लावले जातात तर काही जण सहज जाता जाता विडी,सिगारेट पेटवून टाकतात. वणवा आटोक्यात न आल्यास इतर ठिकाणी आगी लागतात.वनसंपदेचे नुकसान टाळण्यासाठी कठोर उपाययोजना हाती घेणे गरजेचे आहे.वणव्यात सापडत असलेले पशुपक्षी,जनावरे यांनाही मोठी हानी पोहचत आहे.मात्र असे वणवे पेटल्यास जंगलात राहणारी जंगली हिंस्र श्वापदे व इतर जनावरे आसऱ्यासाठी लोकवस्तीत धाव घेतील अशी भिती व्यक्त करण्यात येत आहेत.

पर्यावरणाच्या रक्षणा साठी झाडे लावा,झाडे जगवा अशी गर्जना करणाऱ्या सरकारने भविष्यातील वनसंपदेचे नुकसान टाळण्यासाठी कठोर उपाय योजना हाती घेणे गरजेचे असल्याचे मत नागरिकांकडून व्यक्त केले जात आहे.
वणवे टाळण्यासाठी वन विभागाने डोंगर परिसरातील लोकांच्या जनजागृतीची मोहीम प्रभावीपण राबविण्याची गरज आहे भविष्यात वन विभागाने असे नाही केले तर जंगल नष्ट होतील व उन्हाळ्यात जनावरांना चारा शिल्लक राहणार नाही. त्यामुळे सजीव सृष्टी वाचवण्यासाठी वनसंपदा महत्त्वाची आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe