अहमदनगर Live24 टीम, 7 नोव्हेंबर 2020 :-कोरोनाच्या महामारीमुळे देशाची अर्थव्यवस्था अगदी रसतळाला गेली आहे. अनेकांचा रोजगार गेला असून यामुळे लोकांच्या हाती चलन राहिलेलं नाही. यामुळे अडचणीत सापडलेल्या नागरिकांना मदतीची गरज भासू लागली आहे.
तसेच कोरोनामुळे सर्वसामान्यांसह शेतकरी अडचणीत सापडल्यामुळे ग्रामपंचायत ने चालू वर्षाची घरपट्टी आणि पाणी पट्टी माफ करुन नागरिकाना आधार दयावा या बाबतचे निवेदन निंबळक येथील ग्रामस्थांनी ग्रामविकास अधिकारी आनिल भाकरे यांना दिले .
या निवदेनात म्हंटले आहे कि, निंबळक येथे एमआयडीसी मध्ये काम करण्यासाठी जाणाऱ्या कामगार वर्गाची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. कोरोना मुळे मार्च पासून पाच ते सहा महिने कारखाने बंद होते यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात आर्थीक नुकसान झाले. तसेच यंदा पावसाने मोठया प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुके शेतकऱ्याची पिके जळाली.
यामुळे प्रशासनाने चालू वर्षाची घरपट्टी व पाणी पट्टी पुर्णतः माफ करावी असे निवेदन दिले आहे. यावेळी. डॉ. दिलीप पवाद प्रा . संजय जा जगे, मुरलीधर कोतकर, माधवराव कोतकर, दत्तू आणणा कोतकर, राजेंद्र कोतकर, बी डि.कोतकर, अशोक कोरडे, प्रमोद जाज गे, रामदास पवान, गोवर्धन कोतकर, सुभाष खेसे सह कामगार व शेतकरी उपस्थित होते.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved