Ahmednagar News : नगर अर्बन बँक घोटाळाप्रकरणी आता काही धागेदोरे, महत्वाच्या अपडेट समोर येत आहेत. पोलिसांनी तपासाला गती देत काही अधिकारी, संचालकांना अटक केली आहे.
त्यांच्याकडून कसून चौकशी केली जात असून या चौकशीतून अनेक महत्वाच्या अपडेट आता समोर येऊ लागल्या आहेत. तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार
माजी नगरसेवक मनेष साठे याच्या खात्यातील संशयास्पद व्यवहाराची रक्कम कामरगाव येथे साडेचार एकर जागा खरेदी करण्यासाठी वापरली. तसेच, कारवाई टाळण्यासाठी नंतर ती जागा साठे याने बक्षीस पत्राद्वारे पत्नीच्या नावे केल्याचे आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासात समोर आले आहे.
साठे सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. त्याचप्रमाणे भिंगार अर्बन बँकेतील साठे याच्या खात्यात नगर अर्बन बँकेच्या कर्जदारांकडून मोठ्या प्रमाणावर रकमा जमा झाल्याचेही तपासणीत आढळले आहे. दरम्यान त्यांची कोठडी काल अर्थात २ फेब्रुवारीला संपणार होती.
परंतु न्यायालयात सरकारी वकील अॅड. मंगेश दिवाणे यांनी युक्तिवाद केला. आरोपी संशयास्पद व्यवहाराची माहिती देत नाहीत, त्यांनी आणखी काही मालमत्ता घेतल्या का, याचा तपास करायचा असल्याने वाढीव पोलिस कोठडीची मागणी करण्यात आली. न्यायालयाने सोमवारपर्यंत (५ फेब्रुवारी) दोघांचीही पोलिस कोठडी वाढवली.
कोठडी ५ फेवृवारीपर्यंत वाढवली
संचालक तथा माजी नगरसेवक मनेष साठे व अनिल कोठारी यांच्या पोलिस कोठडीत सोमवारपर्यंत (५ फेब्रुवारी) वाढ केली आहे. २९१ कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने कोठारी व साठे यांना अटक केल्यावर
न्यायालयाने त्यांना शुक्रवारपर्यंत, २ फेब्रुवारी पोलिस कोठडी सुनावली होती. त्याची मुदत संपल्याने त्यांना शुक्रवारी पुन्हा न्यायालयासमोर हजर करण्यात आले. यावेळी पोलिसांनी केलेल्या तपासाची माहिती दिली.