Ahmednagar News : दि युनिव्हर्सिटी ऑफ सेंट्रल अमेरिकाची डी. लिट. पदवी अकोले तालुका एज्यूकेशन सोसायटीचे कार्यकारी विश्वस्त, माजीमंत्री मधुकरराव पिचड यांना नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. त्यांच्या सामाजिक एकता तसेच शैक्षणिक क्षेत्रातील महत्वपूर्ण व विशेष अशा योगदानाबद्दल डॉक्टर ऑफ लेटर्स (डी. लिट) ही गौरवशाली पदवी जाहीर झाली आहे.
नुकतीच सदर पदवी ही इ-मेलद्वारे प्राप्त झाली आहे. या पूर्वी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेने ‘बीर बिरसा मुंडा पुरस्काराने, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या जीवनगौरव पुरस्काराने मधुकरराव पिचड यांना सन्मानित करण्यात आलेले होते.

शैक्षणिक क्षेत्रातील डी. लिट. ने झालेला हा सन्मान म्हणजे माजीमंत्री मधुकरराव पिचड यांच्या आजवरच्या ग्रामीण- आदिवासी भागातील सामाजिक तसेच शैक्षणिक क्षेत्रातील महत्वपूर्ण योगदानाची दखल असून यामुळे तालुक्याची मान देशभर उंचावली असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.
अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे कायम विश्वस्त, आदिवासी उन्नती सेवा मंडळाचे विश्वस्त, माजी आमदार वैभवराव पिचड, गिरजाजी जाधव, स्वीकृत विश्वस्त एम. डी. सोनवणे, सुरेशराव कोते, संपतराव वैद्य तसेच अध्यक्ष सुनील दातीर,
सेक्रेटरी सुधाकर देशमुख, खजिनदार धनंजय संत, कार्यकारिणी सदस्य यशवंतराव आभाळे, डॉ. डी. के. सहाणे, आनंदराव नवले, कल्पना सुरपूरिया, शरदाराव देशमुख, सुधाकर आरोटे, रमेशराव जगताप, मच्छिद्र धुमाळ, शिक्षणाधिकारी एस. पी. मालुंजकर यांच्यासह विविध मान्यवरांनी माजी मंत्री पिचड यांचे कौतुक केले आहे.