अहमदनगर Live24 टीम, 16 मार्च 2022 Ahmednagar Politics :- कोपरगाव येथील माजी मंत्री शंकरराव कोल्हे (वय ९४) वर्ष यांचे आज दिनांक १६ मार्च रोजी पहाटे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले आहे.
त्यांचा अंत्यविधी आज सायंकाळी ४:३० वाजता संजीवनी इंजिनीअरिंग कॉलेज येथे होणार आहे. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होते.
माजीमंत्री शंकरराव कोल्हे हे संजीवनी कारखान्याचे चेअरमन बिपीन कोल्हे यांचे वडील तर माजी आ.स्नेहलता कोल्हे यांचे सासरे व युवा नेते विवेक कोल्हे यांचे आजोबा होत.