अहमदनगर Live24 टीम, 21 नोव्हेंबर 2021 :- आमच्या तालुक्यात आम्ही सोयीचे राजकारण करणार भलेही तलवार हातात घ्यावी लागली तरी चालेल. संघर्ष भयानक झाला असून मतदार संघ वाचविण्यासाठी रक्ताचे पाणी केले आहे.
राजकारणात उलथापालथ चालू असते परंतु या सर्व सामान्य जनतेसाठी रक्ताचा थेंब असे पर्यंत काम करणार असल्याचे मत माजी आमदार विजय औटी यांनी व्यक्त केले. पारनेरमध्ये आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.
ते म्हणाले की, दोन वर्षाच्या कार्यकाळात मी बाहेर पडलो नाही नवीन माणसाला संधी दिली, तो संधीचे सोनै करायला निघाला की लोखंड हे पाहिले मग मी मैदानात उतरलो.
राजकारणात अपरिहार्यता नेत्याला टोकाचे निर्णय घ्यायला लागतात. तर दुसरीकडे के.के.रेंजप्रश्नी मी तीन वेळा संरक्षण मंत्री यांच्या बरोबर बैठक केली आहे.
त्यामुळे कुणीतरी दिशाभूल व वेड्यात काढण्याचे काम करत आहेत. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शिवसेनेला संधी दिली नाही. गृहमंत्री तुरुंगात गेले म्हटल्यावर तोंड दाखवायला जागा नाही.
त्यामुळे सामान्य जनतेच्या पाठीशी नाग़डाख उभे राहिले तर चांगले चित्र उभे राहिल. वीजपुरवठ्याबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी आहेत.
त्यामुळे जिल्ह्याचे पालकमंत्री पद हे शंकरराव गडाख यांना देण्यात यावे अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कडे करणार असल्याचे ते म्हणाले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम