‘त्या’ परिसरात अजूनही चार बिबटे ! वनविभागाने लावले पुन्हा दोन पिंजरे

Published on -

अहिल्यानगर : नगर तालुक्यातील भोरवाडी गावच्या परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून वावर असलेल्या पाच बिबट्‌यांच्या पैकी एक बिबट्या वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बुधवारी (१५ जानेवारी) रात्री जेरबंद झाला आहे. जेरबंद झालेला हा बिबट्‌याचा अंदाजे दीड वर्षाचा बछडा असून अजूनही या परिसरात नर, मादी बिबट्यासह दोन बछड्यांचा वावर असल्याचे वनविभागाने लावलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यात दिसून आले आहे. त्यामुळे वन विभागाने शुक्रवारी (१७ जानेवारी) दुपारी आणखी दोन पिंजरे या परिसरात लावले आहेत

नगर तालुक्यातील भोरवाडी शिवारात भोरवाडी ते चास रस्त्यावर असलेल्या डोंगराच्या कडेला मागील दीड वर्षापासून बिबट्या वेळोवेळी नागरिकांच्या निदर्शनास येत आहे. तीन बिबटे असल्याचे नागरिकांचे माणणे आहे. बिबट्यांचा वावर वाढल्याने

नागरिक दहशतीखाली वावरत असून, चनविभागाने बिबट्‌यांचा तातडीने बंदोवस्त करण्याची मागणी होत होती. त्यामुळे वन विभागाने या परिसरात ट्रंप कॅमेरे लावले. वनविभागासह वन्यजीव अभ्यासक हर्षद कटारिया व त्यांचे सहकारी नितेश पटेल, गौरव मुळे, सचिन क्षीरसागर यांनी गेले अनेक दिवस चारकाईने अभ्यास केल्यावर या ठिकाणी एक नर, एक मादी व त्यांचे साधारणतः दीड वर्षापूर्वी जन्मलेले तीन बछडे असे एकूण पाच बिबटे या परिसरात असल्याचे स्पष्ट झाले

या परिसरात पाच बिबटे असले तरी त्यांनी अद्याप एकदाही मानवावर अथवा पाळीव प्राण्यांवर हल्ला केलेला नाही. या परिसरात ससे, हरीण, मुंगुस, रानडुकरे, भटके कुत्रे अशा वन्य प्राण्यांचा मोठ्या प्रमाणावर वावर आहे. त्यामुळे या बिबट्यांना आयते भक्ष मिळत असल्याने त्यांनी या परिसरातच गेल्या वर्ष दीड वर्षापासून मुक्काम ठोकलेला असावा असा वन विभागाचा अंदाज आहे. या परिसरात इतर वन्य प्राण्यांबरोबरच तरसाचे ही वास्तव्य आहे. २ जानेवारीला रात्री तर एका तरसाची आणि या ठिकाणी असलेल्या दोन बिबट्यांची झुंज झाली होती. यावेळी एका तरसाने दोन बिबट्‌यांना पळवून लावल्याचे वनविभागाच्या ट्रॅप कॅमेऱ्यात वन्यजीव अभ्यासकांच्या टीमला दिसून आले होते.

एक बिबट्या अडकला एक पळाला
या परिसरातील बिबट्यांच्या हालचालीवर वन्यजीव अभ्यासकांचे बारकाईने लक्ष होते. त्यातच ग्रामस्थांच्या मागणीनुसार ग्रामपंचायत सदस्य राहुल जाधव यांनी मागील आठवड्यात वनविभागाला निवेदन देवून बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी केली. वनविभागाला पत्र व्यवहार झाल्यानंतर वनविभागाच्या मार्गदर्शनाखली ग्रामस्थ राजेंद्र हरिभाऊ भोर यांनी स्वखर्चाने बिबट्याचे वास्तव्य जेथे आहे, तिथपर्यंत रस्ता बनवून पिंजरा तिथपर्यंत नेण्यात आला.

बिबटया पकडण्यासाठी त्या पिंजऱ्यात भक्ष ठेवण्यात आले होते. त्या भक्षाची खाण्या पिण्याची जबाबदारी शुभम शुभम भोर यांनी घेतली होती. ग्रा. पं. सदस्य दिपक भोर, वत्ता भोर, गणेश भोर, प्रतीक भोर, योगेश पानसरे, सोमनाथ भोर आदी ग्रामस्थानी त्यास सहाय्य केले. अखेर बुधवारी (१५ जानेवारी) रात्रीच्या वेळी पिंजरा लावला तेथे दोन बिबटे आले. त्यातील एक पिंजऱ्यात अडकला तर एक तेथून पळून गेला

पकडलेल्या बिबट्याला सोडले जंगलात
गुरुवारी (१६ जानेवारी) वनपरिक्षेत्र अधिकारी हरी सरोदे, नव्याने रुजू झालेले वनपरिक्षेत्र अधिकारी अविनाश तेलोरे, वनपाल शैलेश बडदे, वनरक्षक गायकवाड, वनकर्मचारी सखाराम येणारे, योगेश चव्हाण वन्यजीव अभ्यासक हर्षद कटारिया व त्यांचे सहकारी नितेश पटेल, गौरव मुळे, सचिन क्षीरसागर आदींनी त्या ठिकाणी भेट देवून पिंजऱ्यात अडकलेल्या बिबट्‌याला जंगलात नेवून निसर्गात मुक्त केले. आता या परिसरात राहिलेले नर व मादी बिबटे आणि त्यांचे दोन बछडे यांना पकडण्यासाठी वन विभागाने शुक्रवारी (१७ जानेवारी) दुपारी आणखी दोन पिंजरे या परिसरात लावले आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News