संगमनेर कारागृहातून चार कैदी गज तोडून फरार ! पोलीस दलात खळबळ

Published on -

Ahmednagar News : संगमनेर येथील शहर पोलीस ठाण्याच्या कारागृहातून ‘चार कैद्यांनी पलायन केल्याचे उघड झाले आहे. गंभीर र गुन्ह्याप्रकरणी कारागृहात शिक्षा भोगणाऱ्या या आरोपींनी जेलचे गज तोडले आणि ते फरार झाले.

बुधवारी दि. ८ नोव्हेंबर रोजी पहाटे पाच वाजता घडलेल्या या घटनेने पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. या आरोपींना पकडण्यासाठी पोलीस पथके वेगवेगळ्या दिशेने रवाना झाली आहेत. या घटनेमुळे पोलीस प्रशासनाची नाचक्की झाली आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर शहर पोलीस ठाण्यातील जेलमध्ये या चार कैद्यांना इतरांसोबत ठेवण्यात आले होते. या कारागृहामध्ये तीन बराकी आहेत. या जेलमध्ये २४ कैद्यांची क्षमता असतानाही अनेकदा क्षमतेपेक्षा जास्त कैदी या जेलमध्ये ठेवलेले असतात,

त्या कारागृहामध्ये काल रात्री नेहमीप्रमाणे तीन पोलीस कर्मचारी बंदोबस्तास होते. मात्र असे असतानाही चार कैद्यांनी जेलचे गज कापले आणि ते फरार झाले. राहुल देविदास काळे, रमेश थापा, अनिल छबू ढोले आणि मच्छिद्र मनाजी जाधव अशी या चार गुन्हेगारांची नावे आहेत.

संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या शेजारीच हे उपकारागृह आहे. या कारागृहामध्ये बंद असलेल्या कैद्यांची मनमानी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. कारागृहाच्या बंदोबस्तास असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांसोबत नेहमी वादावादीच्या घटना घडतात.

काल पहाटे या कारागृहातील तीन नंबरच्या कोठडीचे गज कापून या आरोपींनी पलायन केले. अनेक दिवसांपासून हे आरोपी संगमनेरच्या उपकारागृहात न्यायालयीन कोठडीत बंदिस्त होते.

पळून गेलेल्या आरोपींपैकी राहुल काळे याच्यावर संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल आहे. मच्छिद्र जाधव याच्यावर खुनाचा प्रयत प्रयत्न केल्याचा तर रमेश थापा याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल आहे.

या आरोपींनी अतिशय नियोजनबद्ध कारागृहातून पलायन केल्याचे दिसत आहे.कोठडीचे गज कापून बाहेर आल्यानंतर कारागृहाच्या बंदोबस्तास असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना दमदाटी करून ते एका खाजगी वाहनामध्ये बसून पळून गेले आहे.

कारागृहातून आरोपी पळून गेल्याचे वृत्त वाऱ्यासारखे पसरले. शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे, तहसीलदार धीरज मांजरे आदी अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी येऊन पाहणी केली.

आरोपी पळून गेले त्यावेळी तीन पोलीस कर्मचारी कारागृहाच्या बंदोबस्तात होते. तीन कर्मचारी बंदोबस्तास असतानाही आरोपींना गज कापण्यासाठी हत्यार उपलब्ध झाल आहे. यामुळे या कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्याविरुद्ध कारवाई होण्याची शक्यता आहे.

संगमनेरच्या कारागृहातून आरोपी पळून गेल्याने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने संगमनेर येथे पला भेट देऊन पाहणी केली आहे. आरोपीच्या शोधासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे पोलीस पथके त्वरित रवाना करण्यात आले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी दिली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe