Sangamner News : संगमनेरमध्ये बिबट्यांचा मुक्त संचार सुरू आणि तरस या प्राण्याचाही धुमाकूळ

Published on -

Sangamner News : संगमनेर शहरातील उपनगरामध्ये बिबट्यांचा मुक्त संचार सुरू असल्यामुळे नागरिक भयभीत झाले असतानाच आता तरस या प्राण्याचाही धुमाकूळ सुरू आहे.

शहरातील कोल्हेवाडी रोड व जमजम कॉलनी परिसरात शुक्रवारी रात्री एक तरस फिरताना अनेकांनी पाहिला- तरसाच्या भटकंतीमुळे या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

संगमनेर शहरालगच्या उपनगराच्या परिसरात ऊस शेती मोठ्या प्रमाणावर केली जाते. त्यामुळे बिबट्यांना लपण्यासाठी जागा उपलब्ध झाली आहे. गेल्या काही महिन्यापासून शहरातील पंचायत समिती परिसरातील गुंजाळनगर, कोल्हेवाडी रोड, देवाचा मळा या परिसरामध्ये बिबट्याचा संचार सुरू आहे.

वनखात्याने पिंजरे लावूनही बिबट्याच्या भटकंतीवर याचा परिणाम झालेला नाही. शुक्रवारी शहरातील मालदाड रोड परिसरात एका घरामध्ये घुसलेल्या बिबट्याला मोठ्या प्रयत्नानंतर जर बंद करण्यात आले.

बिबट्याच्या मुक्त संचारामुळे उपनगरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असतानाच आता तरस हा प्राणी दिसू लागला आहे. शहरातील जमजम कॉलनी परिसरात शुक्रवारी रात्री साडेआठ वाजता सुमारास अनेक नागरिकांनी तरसाला पाहिले.

काहींनी आपल्या मोबाईल मध्ये या तरसाचे व्हिडिओ काढले आहे. कुत्र्यासारखा दिसणारा तरस हा प्राणी मांसाहारी आहे. ज्या ठिकाणी बिबटे आढळतात अशा ठिकाणी हा प्राणी अनेकदा आढळतो.

बिबट्यानी शिकार केलेल्या प्राण्यांचे हाडे तरस खात असतो. स्वतः क्व चित हा प्राणी शिकार करत असतो. शिकार मिळाली नाही तर हा प्राणी शेळ्या बकरे व छोट्या वासरांना शिकार बनवतो.

संगमनेर शहरात लगतच्या कोल्हेवाडी रोड परिसरात तरसाने शेळ्यावर हल्ला करण्याच्या घटना अनेकदा घडल्या आहेत. हा प्राणी आता पुन्हा दिसू लागल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.द

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News