अहिल्यानगर मधील बालाजी फाउंडेशन यांनी भाषणकला प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित केली आहे. शनिवार दिनांक 12 एप्रिल रोजी सकाळी 11 ते 2 या वेळेत सावेडी येथील देशभक्त रावसाहेब पटवर्धन स्मारकात या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असून वक्तृत्व, सूत्रसंचालन, निवेदन, आवाजाच्या क्षेत्रातील संधी यावर यात मार्गदर्शन करण्यात येईल असे अध्यक्ष अमित आव्हाड यांनी सांगितले.
अहिल्यानगर जिल्ह्यातील सुप्रसिद्ध निवेदक, व्हाईस ओव्हर आर्टिस्ट उद्धव काळापहाड KP , डबिंग आर्टिस्ट प्रा विजय साबळे, अभिनेते, निवेदक प्रा. प्रसाद बेडेकर हे यात मार्गदर्शन करणार असल्याची माहिती आव्हाड यांनी दिली.
या कार्यशाळेत स्टेज डेअरिंग, आदर्श वक्त्याचे गुण, आवाजाचे व्यायाम, वक्तृत्वाला झळाळी देण्यासाठीच्या टिप्स, तसेच करिअरच्या संधी यावर या कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात येईल.

तरी इच्छुकांनी 9309530363 या मोबाईल नंबर वर नावनोंदणी करावी असे आवाहन बालाजी फाउंडेशन चे उपाध्यक्ष किरण वाकचौरे यांनी केले आहे.
कार्यशाळा यशस्वी व्हावी यासाठी सागर मेहेत्रे, जालिंदर शिंदे, ज्ञानेश्वर आव्हाड, जावेद सय्यद, शिवानी शिंगवी, भगवान राऊत आणि बालाजी फाउंडेशन चे सदस्य परिश्रम घेत आहेत…