मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा ! बिबट्या पिंजऱ्यात अडकला, त्याचे तीन साथीदार बिबटे आले आणि दरवाजा तोडून त्याला बाहेर काढून फरार झाले, अहिल्यानगरमधील थरार

Published on -

अहिल्यानगरमधील एक गाव.. गावात एक दोन नव्हे चार चार बिबटे.. गावात सगळीकडे दहशत.. वनविभागाने पिंजरा लावला.. त्यात एक बिबट्या अडकला.. गावकरी व वनविभागाचे अधिकारी आले.. तेथे गावकऱ्यांनी इतरही बिबटे जेरबंद करा म्हणत वाद घालायला सुरवात केली.. तितक्यात त्या बिबट्याचे इतर तीन साथीदार बिबटे आले.. त्यांनी पिंजऱ्याला धडाका मारून मारून पिंजऱ्याच्या दरवाजाचे लॉक वाकून टाकले… आतला साथीदार बिबट्या बाहेर आला.. अन चौघांनीही शेतात धूम ठोकली.. हा बिबट्यांच्या अनोखी दोस्तीचा थरार दिसला राहुरी मधील

कुरणवाडी येथे..

यामुळे शेतकरी भयभीत झाले आहेत. कुरणवाडी शिवारात चार-पाच बिबट्यांचा वावर असल्याने शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण आहे. यातील एक बिबट्या पिंजऱ्यात अडकला.

यामुळे शेतकऱ्यांनी काहीसा सुटकेचा निश्वास टाकला. माञ अडकलेल्या बिबट्याच्या पिंजऱ्याबाहेर आणखी तीन-चार बिबटे घिरट्या घालत असल्याचे शेतक-यांनी बघितले. त्यामुळे दुसरे बिबटे पकडण्यासाठी तत्काळ या ठिकाणी आणखी पिंजरे लावावेत, अशी मागणी करण्यात आली. आणखी पिंजरे लावल्यानंतरच पिंजऱ्यात बंद झालेल्या बिबट्याला हलवावे, अशी आक्रमक भूमिका ग्रामस्थांनी घेतली.

यामुळे केल्याने ग्रामस्थ आणि वन विभागाच्या कर्मचाऱ्यांमध्ये वाद झाला. मात्र काही वेळातच पकडलेल्या बिबट्याच्या पिंजऱ्याबाहेर तीन बिबटे आले. त्या तीन बिबट्यांनी पिंजऱ्याच्या दरवाज्याला धडका देत पिंजऱ्याचा लॉक वाकवले. त्यामुळे अडकलेला बिबट्याने बाहेर येत आपल्या तीन साथीदारांसह धूम ठोकली. पकडलेला बिबट्या पिंजऱ्यातून निसटल्याने वन विभागाची चांगलीच दमछाक झाली. येथे लावलेल्या पिंजऱ्याचे लॉक व्यवस्थित नसल्यानेच बिबट्या पिंजऱ्यातून निसटला, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

पिंजऱ्यात अडकलेल्या बिबट्यामुळे बाहेर असलेल्या तीन बिबट्यांनी पिंजऱ्याच्या दरवाज्याचा धडका देत लॉक वाकवुन अडकलेल्या बिबट्याची सुटका करून घेतल्याने पुन्हा एकादा वनविभागाचा हलगर्जीपणा चव्हाट्यावर आला आहे. उसाचे क्षेत्र घटल्याने ग्रामीण भागात सर्वत्रच बिबट्यांनी उच्छाद मांडला आहे.

बिबटे जास्त आणि पिंजरे कमी असी अवस्था आहे. राहुरी तालुक्यात बिबट्यांची संख्या वाढत असून, अशातच पिंजऱ्यात अडकेल्या बिबट्याला इतर बिबट्यांनी सोडविण्यासाठी केलेला प्रकार धक्कादायक आहे. ग्रामस्थ आणि वन कर्मचारी यांनी समन्वयाने काम करण्याची गरज आहे. कुरणवाडी येथे समन्वयाऐवजी वाद घालत बसल्याने अडकलेला बिबट्या गेला. त्यामुळे दोष कुणाला द्यायचा, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe