सुमारे १८२ गावांसाठी वरदान ठरलेल्या निळवंडे धरणाच्या टेलच्या भागाचे पाणीपूजन करण्याचे भाग्य मला तुमच्याच मुळे लाभले. त्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचे मोठे पाठबळ मिळाले;
मात्र आता येथून पुढे आपला लढा घाट माथ्यावरील ११५ टीएमसी पाणी अडवून येथील शेतकऱ्यांच्या बांधावर जिरवणे यासाठी चालू होणार असल्याचे सूतोवाच खासदार सदाशिव लोखंडे यांनी केले.

राहाता तालुक्यातील चितळी येथे निळवंडेतून सुटलेल्या पाण्याचे पूजन खासदार लोखंडे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी किसान सभेचे ज्येष्ठ नेते गंगाधर चौधरी होते.
प्रारंभी खासदार लोखंडे यांची गावातून ढोल ताशाच्या व डीजेच्या आवाजात गावातून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी चितळी नागरिकांच्या वतीने ५० किलोचा पुष्पहार क्रेनच्या साह्याने घालून चांदीची गदा भेट देण्यात आली.
निळवंडे कृती समितीचे नानासाहेब शेळके यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी कृती समितीचे दत्ता भालेराव, पुणतांबा विकास आघाडीचे धनंजय जाधव, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष कमलाकर कोते आदींनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमास उत्तमराव घोरपडे, नानासाहेब शेळके, कमलाकर कोते, चितळीचे सरपंच नारायणराव कदम, उपसरपंच सोनाजी पगारे, सुरेश वाघ, दीपक वाघ, जळगावचे उपसरपंच शंकरराव चौधरी, गणेशचे संचालक संपतराव चौधरी, अॅड. अशोकराव वाघ, रवींद्र वाघ, सर्जेराव जाधव, रंगनाथ रकटे, प्रकाश रकटे, अंजा अंजाबापू रकटे,
सौरभ शेळके, बाबासाहेब वाघ, बाळासाहेब वाघ, विक्रम वाघ, दिलीप वाघ, सोपान वाघ, संभाजी तनपुरे, संदीप वाघ, रेवनाथ वाघ, रावसाहेब थोरात, सागर बढे, शिवाजी वाणी, संपत वाणी, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र वाणी, प्रकाश आरणे, आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रसन्न धुमाळ, आगलावे महाराज यांनी केले.
खासदारांनी धरला गाण्यावर ठेका निळवंडेचे पाणी टेलच्या भागास मिळाल्याने शेतकऱ्यांनी आनंदोत्सव साजरा करताना डीजेच्या तालावर ठेका धरत खासदारांना डोक्यावर घेतले. अपसुकच गाण्याच्या तालावर खासदार थिरकल्याचे पाहून आणखी रंगत वाढली.
साडेनऊ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली निळवंडेच्या पाण्यामुळे चितळी, धनगरवाडी टेलच्या परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून खासदार लोखंडे यांच्या प्रयत्नाने येथील शेतकरी खऱ्या अर्थाने सुखावला आहे. येथील सुमारे एक हजार हेक्टरवर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. – सुरेश वाघ, सदस्य, निळवंडे कृती समिती