Ahmednagar Crime News : चोरी करताना पकडल्याचा राग; १० जणांकडून एकास मारहाण

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar Crime News

कापूस चोरून नेत असताना दोघा जणांना रंगेहाथ पकडले, याचा राग मनात धरून सुमारे १० आरोपींनी मिळून अक्षय तनपुरे या तरुणाला शिवीगाळ, दमदाटी करून लाकडी दांडा, लोखंडी गज व लाथा बुकक्यांनी मारहाण केल्याची घटना राहुरी शहरातील स्टेशन रोड परिसरात दिनांक ९ डिसेंबर २०२३ रोजी घडली.

याबाबत सूत्रांनी सांगितले, की अक्षय अशोक तनपुरे (वय २८ वर्षे, रा. पिंपळाचा मळा, राहुरी ता. राहुरी) हा तरुण दिनांक ९ डिसेंबर २०२३ रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास त्याच्या शेतामधून घरी येत होता, तेव्हा त्याच्या शेडमध्ये गोण्यामध्ये साठवून ठेवलेला कापूस दोन इसम चोरी करून घेऊन जात असताना दिसले.

तेव्हा अक्षय तनपुरे याने ‘शेडजवळ जाऊन पाहिले असता आरोपी करण मोरे व गौरव तनपुरे हे दोघे कापुस चोरुन नेत असताना दिसले. अक्षय याने त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला; मात्र ते हाताला झटका देऊन पळून गेले.

त्यानंतर अक्षय सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास करण मोरे व गौरव तनपुरे या दोघांसह इतर ८ अनोळखी आरोपींनी स्टेशन रोड परिसरात पंचायत समीती कार्यालयासमोर अक्षयला अडवले आणि शिवीगाळ दमदाटी करुन लाकडी दांडा, लोखंडी गज व लाथा बुक्क्यांनी मारहाण करुन जखमी केले.

घटनेनंतर अक्षय अशोक तनपुरे याने तरुणाने राहुरी पोलिस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दाखल केली. त्याच्या फिर्यादीवरून आरोपी ‘करण कैलास मोरे, गौरव विजय तनपुरे (दोघे रा. पिंपळाचा मळा, राहुरी, ता. राहुरी ) तसेच अनोळखी आठजण अशा १० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe