अहमदनगर Live24 टीम, 13 डिसेंबर 2021 :- शिवसेना पक्षाचे पदाधिकारी व शिवसैनिक यांना कोणतीही अडचण आली तरी मी तुमच्यासोबत खंबीरपणे उभा आहे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात शिवसंपर्क अभियान सुरू आहे.(Shankarrao Gadakh)
त्यानुसार शिवसेनेचे मंत्री ना. शंकरराव गडाख यांचा जिल्हाभर दौरा सुरु आहे. गडाखांच्या या दौऱ्यामध्ये युवकांचे संघटन करून पक्ष संघटना बळकट करण्यासाठी नियोजन केले जात आहे.

या दौर्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारीही सुरू असून जिल्ह्यात शिवसैनिकांना ताकद देऊन पक्ष आणि संघटना मजबूत करण्याचा निर्धार जलसंधारण मंत्री ना. शंकरराव गडाख यांनी व्यक्त केला.
रविवारी ना.गडाख यांनी पाथर्डी तालुक्यातील अनेक गावांना भेटी देऊन तेथील शिवसेना, युवासेना शाखांचे उद्घाटन व शाखा नूतनीकरण केले.
यावेळी बोलताना गडाख म्हणाले, जेव्हा संधी मिळेल त्या संधीचं सोनं करावं, जलसंधारण विभागा अंतर्गत सुरू असलेल्या मुख्यमंत्री जलसंवर्धन योजनेतून व जलसंधारण महामंडळाच्या अंतर्गत पाथर्डी तालुक्यात अनेक कामे प्रगतीपथावर आहेत.
पाथर्डी तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यातील सुमारे 1 हजार 300 पाझर तलाव, बंधारे दुरुस्त करण्यासाठी आराखडा तयार केला असून येणार्या काळात जास्तीत जास्त प्रमाणात ही कामे करण्याचा प्रयत्न असणार आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम