Ahmednagar News:कर्जत तालुक्यात शिवसेनेचा विस्तार करून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठिंबा देण्यात येणार आहे.
त्यासाठी ‘गाव तिथे शिवसेनेची शाखा आणि घर तिथे शिवसैनिक’ हे अभियान राबविण्याचा निर्णय घेण्यात आला.जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी व तालुकाप्रमुख बळीराम यादव यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक झाली.
![](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2022/07/WhatsApp-Image-2022-07-08-at-4.00.06-PM.jpeg)
यामध्ये ठाकरे यांना तालुका शिवसेनेच्या वतीने पाठिंबा देण्यात आला तर शिवसेना सोडून गेलेल्यांचा निषेध करण्यात आला. याच बैठकीत तालुक्यात पक्ष नोंदणी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.
त्याची तातडीने अंमलबजावणी करीत नव्या सदस्यांना लगेच नोंजणीपत्रही देण्यात आली.या बैठकीला अमृत लिंगडे, महावीर बोरा, सुभाष जाधव, अक्षय तोरडमल, चंद्रकांत घलमे, पोपट धनवडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.पदाधिकाऱ्यांनी बंडखोर आमदारांवर जोरदार टीका केली. या गद्दारांना राज्यातील जनतेने त्यांची जागा दाखवावी असे आवाहनही करण्यात आले.