Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील अपघातांच्या घटना काही कमी होईनात. शिरढोण उड्डाणपुलावरील भीषण अपघाताची घटना ताजी असतानाच आता आणखी एक अपघाताचे वृत्त आले आहे.
गॅसच्या टाक्या घेऊन जाणारा ट्रक कारवर उलटून भीषण अपघात झाला. यात तिघे जखमी झाले आहेत. शुक्रवारी सकाळी ६ वाजता नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील घुलेवाडी शिवारात हा अपघात घडला. यामध्ये ट्रकचालक घनश्याम परमार, तर कारमधील भैय्या वालझाडे व चैतन्य मावळे जखमी झाले आहेत.

अधिक माहिती अशी : ट्रक (जी.जे. २३, ए.टी. ४२४८) मध्ये गॅस टाक्या भरलेल्या होत्या. हा ट्रक नाशिकहून पुणे येथे चालला होता. चालक घनश्याम म्हैसभाई परमार (वय २४, बडोदा-गुजरात) याचा ट्रकवरील ताबा सुटला.
त्यामुळे हा अनियंत्रित झालेला ट्रक घुलेवाडी शिवारात कारवर (एमएच १४, के.डब्ल्यू. ६५३९) पलटी झाला. या अपघातात तिघे जखमी झाले. महामार्गावर टाक्यांचा खच पडला होता.
अपघाताची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. यातील जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलवले. पोलिसांनी गॅस टाक्या एका ठिकाणी गोळा करून महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली.