Gautami Patil : गौतमी पाटील हि सध्याच्या घडीला सर्वाधिक चर्चेत असलेली नृत्यांगना बनलेली आहे. विविध ठिकाणी तिचे शोचे आयोजन केले जाते. तिचा शो पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी देखील मोठी होत असते.
मात्र याच गर्दीमुळे देखील काही अनुचित प्रकार देखील घडतात. याचाच प्रत्यय आला तो म्हणजे पारनेरमधील एका ग्रामपंचायतीला. गौतमीचा कार्यक्रम पाहण्यासाठी काही तरुण ग्रामपंचायतीच्या मालकीच्या गाळ्यावर चढले आणि पत्रा खचल्याने यामधील एक तरुण थेट आता पडला.
यामुळे तरुण तर जखमी झाला आहे, मात्र या सगळ्या भानगडीत ग्रामपंचायतीच्या गाळ्याचे मात्र नुकसान झाले आहे. सध्या गौतमी पाटील हि नृत्यांगना तरुणांच्या गळ्यातील ताईत बनली तिच्या कार्यक्रम पाहण्यासाठी पंचक्रोशितुन मोठ्या संख्येने तरुण व चाहते कार्यक्रमाला उपस्थिती लावतात.
नुकतेच पारनेर तालुक्यातील जवळे येथील काही युवकांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याला प्रसिध्द नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या नाचगाण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. यावेळी जवळा बाजारतळ पुर्ण क्षमतेने भरल्यामुळे गौतमीचे चाहते तिला पाहण्यासाठी व तिच्या कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी आसपासच्या ईमारती , मंदिरे व वेशीवर बसले होते. कार्यक्रम ऐन जोमात आल्यावर काही अतिउत्साही युवक वेशी शेजारील ग्रामपंचायत जवळे यांनी बांधलेल्या दुकान गाळ्यावर चढले .
व तिथे उभे राहुन कार्यक्रमाला प्रतिसाद देताना नाचु लागले. परंतु त्यामुळे गाळ्याच्या पत्र्याला मोठे भगदाड पडून एक युवक गाळ्यात खाली कोसळला . नंतर त्याला बाहेर काढण्यात आले . त्यात तो जखमी झाला असुन . दुकानातील काही साहीत्याची मोडतोड झाली आहे.
दरम्यान या घटनेत दुकानाच्या झालेल्या नुकसानी बाबत ग्रामपंचायत व कार्यक्रमाचे आयोजन यांनी मात्र कानावर हात ठेवले आहेत. त्याच्या भरपाईची कुणीही दखल घेईना. यामुळे गौतमीचा कार्यक्रम संबंधित दुकानदारासह ग्रामपंचायतीला चांगलाच भारी पडला आहे.