Ahmednagar News : सामान्य जनता हिच गडाख कुटुंबाची ताकद !

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News : विकासकामांसाठी निधी मिळवताना अनेक अडचणी येत आहेत, तरी माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख नेवासा तालुक्यातील विकासकामांसाठी नेहमीच प्रयत्न करत आहेत.

सामान्य जनता हिच गडाख कुटुंबाची ताकद असल्याचे प्रतिपादन जयश्रीताई गडाख यांनी केले.

कुकाणा येथे आयोजित एका कार्यक्रमात गडाख बोलत होत्या. मंचावर माजी उपसभापती राजनंदिनी मंडलिक, सरपंच लताताई अभंग, ज्येष्ठ नेते भैय्यासाहेब देशमुख, मार्केट कमिटीचे संचालक दौलतराव देशमुख, अशोक मंडलिक, माजी सरपंच एकनाथराव कावरे, बाळासाहेब कचरे माजी उपसरपंच भाऊसाहेब फोलाने, नामदेराव उंडे, अमोल अभंग, सोमनाथ कचरे उपस्थित होते.

गडाख म्हणाल्या, कितीही अडचणी आल्या तरी आमदार गडाख विकासकामे थांबू देणार नाहीत. सर्वांनी सहकार्य करून त्यांचे हात बळकट करा, असे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी कारभारी गोर्डे, भाऊसाहेब सावंत, संदीप देशमुख, बाबासाहेब घुले, नानासाहेब खराडे, महेश उगले, अरुण मिसाळ, मुसा इनामदार, मछिंद्र जाधव, बाबासाहेब खराडे, राजेंद्र खराडे, प्रशांत देशमुख, राजेंद्र म्हस्के, बाबासाहेब गोल्हार, समीर पठाण, इकबाल इनामदार, सुभाष चौधरी,

अशोकराव गर्जे, शाकीर इनामदार, अजय रिंधे, रखमाजी लिपने, सोपानराव घोडेचोर, जालिंदर तुपे, अशोक भूमकर, अशोक दरवडे, सिद्धार्थ कावरे, शकूर इनामदार यांच्यासह ग्रामस्थ व महिला उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रास्तविक अमोल अभंग यांनी केले तर आभार सोमनाथ कचरे यांनी मानले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe