Ahmednagar Politcs : घुले बंधू राष्ट्रवादीच्या कोणत्या गटाचे ? एकीकडून आमदारकी अशक्य तर दुसरीकडच्या मेळाव्यास दांडी..कार्यकर्तेही संभमात

Ahmednagar Politics

अहमदनगर जिल्ह्यात राष्ट्रवादीचे वर्चस्व राहिलेले आहे. आजवर जिल्ह्याने अनेक आमदार राष्ट्रवादीचेच दिले आहेत. अहमदनगरमध्ये शेवगाव पाथर्डीचे घुले बंधू यांनी आपले एक वर्चस्व राजकारणात ठेवले आहे.

माजी आमदार नरेंद्र घुले व माजी आमदार चंद्रशेखर घुले हे बडे राजकीय प्रस्थ. शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे नरेंद्र घुले यांचे सख्खे मेहुणे आहेत तर चंद्रशेखर घुले हे अजित पवार यांचे निकटवर्ती असल्यकचे सर्वश्रुत आहे.

दरम्यान आता राष्ट्रवादीध्ये दोन गट पडल्यानंतर मात्र घुले बंधूनी आजवर आपला गट कोणता, आपण कोणत्या बाजूने आहोत हे आजवर जाहीर केले नाही. नुकत्याच झालेल्या शरद पवार गटाच्या मेळाव्यास घुले बंधू आले नाहीत. तसेच त्यांनी अद्याप आपण अजित पवार गटात आहोत हे देखील जाहीर केले नाही. त्यामुळे सध्या त्यांचे कार्यकर्ते देखील संभ्रमात पडले आहेत.

घुले बंधुंची भूमिका

राष्ट्रवादीतून बाहेर पडत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वेगळा गट निर्माण केला. ४३ आमदारांना सोबत घेत ते सत्तेत गेले. शरद पवार यांच्यासोबत खा. सुप्रिया सुळे, आ. रोहित पवार, आ. जितेंद्र आव्हाड, खा. अमोल कोल्हे आदींची टीम राहिली. त्यानंतर जिल्हा व तालुका स्तरावरील बहुतांश नेत्यांनी आपल्या सोयीनुसार भूमिका जाहीर करत दोन्ही पैकी एका गटात गेल्याचे दिसले.

परंतु जिल्ह्यातील बडे प्रस्थ घुले बंधू मात्र अद्यापही आपली भूमिका जाहीर करताना दिसत नाहीत. दोन महिन्यांपूर्वी खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत पाथर्डीत कार्यकर्त्यांचा झालेल्या मेळाव्यात व आताच्या शिर्डीत आता शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांचे शिबिर झाले त्यातही घुले बंधूनी अनुपस्थिती दर्शवली.

राष्ट्रवादीतील नेमका कुठला गट स्वीकारावा, असा पेच सध्या या दोघांसमोरही पडल्याचे दिसत असून राष्ट्रवादीच्या कार्यकत्र्यांसह मतदारसंघातील नागरिकांमध्येही घुले बंधू काय निर्णय घेतात, यांच्याकडे नजर लागली आहे.

राजळेंमुळे आमदारकीची उमेदवारी अशक्य

घुले हे पवार कुटुंबीयांचे विश्वासू मानले जातात. परंतु ते मध्यंतरी भाजपात जाणार अशी चर्चा होती. परंतु पाथर्डी-शेवगाव मतदारसंघातील आमदार मोनिका राजळे या भाजपच्या स्टँडिंग आमदार आहेत.

त्यामुळे महायुतीच्या जागावाटप सूत्रानुसार ही विधानसभेची जागा भाजपच्या वाट्याला जाणार हे सर्वानाच समजते. जर ते अजित पवार यांच्या गटात गेले तरीही पाथर्डी-शेवगाव मतदारसंघात उमेदवारी मिळवणे अशक्यच दिसते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe