‘आत्महत्या केलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी २० लाखांची मदत द्या’

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 20 डिसेंबर 2021 :-  अपघात सहायता निधी योजनेच्या ट्रस्ट मधून एसटीच्या ज्या कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली, त्यांच्या कुटुंबियांना २० लाख रुपये आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघाचे अध्यक्ष रणजीत श्रीगोड यांनी केली आहे.(Ahmednagar news)

एसटी संपाच्या काळात राज्यातील ४२ एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली आहे. त्यांचा परिवार उद्ध्वस्त झाला आहे. हा संप एसटीच्या इतिहासात मोठा संप आहे.

संपकाळात एसटी कर्मचाऱ्यांना आत्महत्या करावी लागली ही दुर्दैवी घटना आहे. राज्य शासनाने प्रवाशाला प्रवास करताना अपघातात मृत्यू झाल्यास

त्याच्या कुटुंबाला दहा लाख रुपये देण्याची तरतूद करण्यासाठी अपघात सहाय्यता निधी योजनेची स्थापना करून विश्वस्त मंडळ तयार करण्यात आले.

या योजनेत निधी जमा करण्यासाठी प्रवासी जनतेकडून दर प्रवासातील तिकिटामागे एक रुपया विशेष निधी वसूल करण्यात येत आहे. त्या जमा होणाऱ्या निधीतून मृत व्यक्तीच्या कुटुंबाला दहा लाख रुपये देण्याची तरतूद करण्यात येते.

हा पैसा जनतेचा अाहे. त्यामुळे या निधीतून विशेष बाब म्हणून विश्वस्त मंडळाच्या सभेत ठराव करून त्या ४२ एसटी कर्मचाऱ्यांना कुटुंबातील उदरनिर्वाह व पाल्याचे शिक्षणाची व्यवस्था होण्यास प्रत्येकी २० लाख रुपये देण्यात यावेत, अशी मागणी प्रवासी महासंघाच्या वतीने करण्यात आली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe