अहमदनगर Live24 टीम, 20 ऑक्टोबर 2021 :- जिल्ह्यात पुन्हा एकदा बिबट्याने दहशत माजवायास सुरुवात केली आहे. अनेक ठिकाणी हल्ल्याच्या घटना घडत असताना जिल्ह्यातील अकोले येथून एक नागाचा थरकाप उडविणारी घटना समोर येत आहे.
एका बिबट्याच्या जबड्यातून एक दीड वर्षीय बालिका बालंबाल बचावल्याची घटना घडलीय. बिबट्याच्या हल्ल्यात गंभीररित्या जखमी झालेल्या या बालिकेवर अकोले येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

माई जनक वैद्य (वय दीड वर्ष) असे या बालिकेचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, सुगाव खुर्द गावापासून सुमारे अर्धा किलो मीटर अंतरावर सुखदेव भिकाजी वैद्य यांचे रस्त्यालगत घर आहे.
त्यांची नात सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास घराच्या ओट्यावर खेळत होती. बाजूच्या डाळिंबाच्या बागेतून अचानक आलेल्या एका बिबट्याने या बालिकेवर झडप घालून तिला जबड्यात पकडले व तिला घेऊन चालला होता.
हे दृश्य पाहून तेथे असलेल्या तिच्या बहिणींनी आरडा ओरडा सुरू केला, त्याच वेळेला समोरून एक दूधवाला येत होता. मोटारसायकल च्या प्रकाशाने तसेच अचानक मोटरसायकल समोर आल्यामुळे बिबट्या डचकला व त्याने मुलीला तेथेच टाकून बाजूच्या उसात पळ काढला.
जखमी बालिकेला तातडीने अकोले येथील डॉ. भांडकोळी यांचे रुग्णालयात आणण्यात आले,तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर तिला येथीलडॉ बुळे यांच्या रुग्णालयात दाखल करणयात आले.
त्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेतली. तसेच मुलीचा सर्व उपचार खर्च वन विभागाचे वतीने केला जाईल असे सांगितले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम