अहमदनगर Live24 टीम, 16 नोव्हेंबर 2021 :- श्रीरामपूर शहरातील राम मंदिर चौक परिसरात असणारे पोपट भगीरथ महाले ज्वेलर्सचे मालक अमोल प्रकाश महाले,वय 42 वर्ष यांना काल एका अज्ञाताने अनोळखी मोबाइल क्रमांकावरून फोन करून तब्बल दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली.
या खंडणीखोराने दोन कोटी रुपये घेऊन छत्रपती शिवाजी महाराज रोडवरील एका इमारतीत येण्याचे सांगितले.
तसेच पोलिसांना कळवले तर त्रास होईल अशी धमकी देखील दिली.
या प्रकारावरून श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात काल रात्री खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आज रोजी याच अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री.अनिल कटके हेदेखील पथकासह श्रीरामपूर शहरात हजर झाले आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक घायवट हे करीत आहेत.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम